प्रतीकात्मक फोटो - Canva
नवी दिल्ली, 16 जुलै : गेली दोन-तीन वर्षे कोरोना काळात खूपच भयानक गेली. गरीबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनीच संकटाशी लढा दिला. कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना केला. पण आता तसं आयुष्य पुन्हा सुरळीत झालं आहे. त्यातही लवकरच मोठी गूड न्यूज मिळणार आहे. 6 महिन्यांत संपूर्ण जगाला आनंदाची बातमी मिळणार असल्याचं सांगितलं जातं आहे. एका टाइम ट्रॅव्हरलने हा दावा केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा काही लोक स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवतात. म्हणजे ते भविष्यात जाऊन आलेले असतात. भविष्यात काय काय घडणार ते पाहतात आणि त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना सांगतात. हे दावे खरे ठरतातच असे नाही. पण तरी लोकांना आपल्या भविष्याबाबत जाणण्याची उत्सुकता नेहमीच असते. अशाच एका टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्यानंतर आता लोक दिवस मोजू लागले आहेत. व्यक्तीने पाडला पैशांचा पाऊस! रस्त्यावर पैसाच पैसा, पण एकानेही उचलली नाही नोट कारण… हा टाइम ट्रव्हलर 2671 सालापर्यंत जाऊन आला. म्हणजे पुढची 647 त्याने पाहिल्याचं तो सांगतो. एनो अॅलारिक असं त्याचं नाव. @theradianttimetraveller त्याचंसोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने पुढील काही महिन्यांत घडणाऱ्या घटनांबाबत सांगितलं आहे. त्याने सांगितलं, 13 जानेवारी 2024 रोजी अमरत्वाचा स्फटिक सापडेल. त्याला जो स्पर्श करेल तो अमर होईल. त्याला स्पर्श केल्यानंतर सर्व भावना संपतील. विश्वास काहीच संपत नाही हे तुम्हाला दिसेल. त्याने या क्रिस्टलचा फोटोही शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर 22 मे 2024 रोजी एक द्रव तयार केला जाईल, ज्याला स्पर्श केल्यावर त्यात पडणारी सावली जिवंत होईल. शास्त्रज्ञ त्याचे संपूर्ण तलाव बनवतील, जेणेकरून अधिक चाचण्या करता येतील. त्याला द ग्रेट मिरर लेक म्हटलं जाईल. आयुष्यभराची पुंजी खर्चून घेतलं ‘ड्रिम हाऊस’; राहायला जाताच बसला मोठा धक्का अनेकांनी या टाइम ट्रॅव्हलरचा दावा नाकारला आहे. त्याच्या या विचित्र अंदाजानंतर त्याचे किती दावे खरे ठरले, अशी विचारणा त्याला काही युझर्सनी केली आहे. तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी मात्र असं होऊ नये, माणूस अमर होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.