4 वर्षांपूर्वीच या ठिकाणी 2000 च्या नोटा बॅन
नवी दिल्ली, 25 मे : 2000 ची नोट भारतीय चलनात राहणार नाही. नुकताच याविषयी केंद्क सरकारने घोषणा केली आहे. तेव्हापासून सर्वत्र एकच खळबळ उडाली असून लोक नोट बदलण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेने 2000 ची नोट परत करण्यासाठी काही वेळ दिला आहे. तेवढ्या वेळातच तुम्हाला 2000 ची नोट बदलून मिळणार आहे. मात्र असाही एक देश आहे जिथे आपल्या 2000 या नोटा पहिल्याच बंद आहेत. हा देश नेमका कोणता आहे आणि इथे आपल्या नोटा का बंद करण्यात आल्या आहेत याविषयी जाणून घेऊया. तुम्हाला कुठल्याही देशात जायचं असेल, फिरायचं असेल, तर तुमच्याकडे त्या देशाचं चलन असणं आवश्यक असतं. पण भारताचे काही शेजारी देश आहेत जिथे भारतीय नोटा वापरल्या जातात. पण भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये गेल्या नोटाबंदीनंतर अनेक समस्या दिसल्या.
नेपाळने 2018 च्या अखेरीसच स्पष्ट केले होते की तेथे नवीन भारतीय नोटा वापरल्या जाणार नाहीत. नेपाळच्या या निर्णयानंतर भारत सरकारने जारी केलेल्या दोन हजारआणि पाचशे रुपयांच्या दोन हजाराच्या नव्या नोटांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. तेथे फक्त आणि फक्त 100 रुपयांच्या भारतीय नोटा चलनात आहेत. हेही वाचा - बारावीत नापास झाले तरीही आज आहेत IAS IPS अधिकारी जर तुम्ही नेपाळला जात असाल तर तुमच्यासोबत फक्त शंभराचा गठ्ठा ठेवा. तरच तुम्ही तिथे आरामात फिरू शकाल. भारतात नोटाबंदी होताच नेपाळ राष्ट्र बँकेने भारतीय नवीन नोटांवर बंदी घातली होती. नेपाळी प्रवासी या नोटा भारतातून देशात आणणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच भारतीय पर्यटकांनी दिलेल्या या नोटांना नेपाळमध्ये काही किंमत राहणार नाही, असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, अनेक देशांमध्ये तुम्हाला चलन बदलून घ्यावे लागते. तुम्ही तिथल्या बँकेत किंवा अशा कोणत्याही संस्थेत भारतीय चलन जमा करता जिथून तुम्हाला त्या देशाचे चलन दिले जाते.