JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाईक चालवताना तरुणीचा नको तो कारनामा; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल

बाईक चालवताना तरुणीचा नको तो कारनामा; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल

मुलीने एक्सीलरेटर दाबताच गाडीचं पुढचं चाक पूर्णपणे हवेत उचलतं आणि दोन्ही मैत्रिणी खाली पडतात. पडताना समोरच्या मुलीने स्वत:ला सांभाळलं मात्र मागे बसलेली तरुणी धाडकन आपटली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 मार्च : रस्त्यावर नेहमी सावधपणे वाहन चालवलं पाहिजे, कारण येथे विविध प्रकारचे चालक असतात. काही लोक रॅश ड्रायव्हिंग करतात, तर काही जण इतरांची पर्वा करत नसल्यासारखं चालतात आणि या लोकांना सोशल मीडियाच्या भाषेत हेवी ड्रायव्हर म्हटलं जातं. पण स्कूटी आणि बाईक चालवणाऱ्या मुलींची पातळी थोडी वेगळी आहे. त्या केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही धोका असतात, असं म्हटलं जातं. याच कारणामुळे लोक त्यांच्यापासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवूनच चालतात. भरधाव वेगाने आलेली गाडी थेट वृद्धाच्या अंगावर; धडकी भरवणारा अपघात, Video सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. आपल्या सर्वांना माहित आहे की, नवीन लोक बाईक किंवा स्कूटी शिकत असताना, खूप उत्साही असतात आणि या उत्साहात अनेक वेळा नको ते घडतं. कारण बरेचदा असं घडतं की ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला जातो आणि नंतर गेम आपल्यासोबतच होतो. आता हा समोर आलेला व्हिडिओ तुम्हीच बघा, जिथे एक मुलगी नवीन पद्धतीने बाईक चालवायला शिकत आहे. यादरम्यान, तिच्यासोबत असंकाही घडतं की हा नवा गेम तिला भलताच महागात पडतो.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका गावातील आहे ,जिथे दोन मुली बाईक चालवत आहेत. ती ज्या पद्धतीने बाईक चालवते ते पाहून हे स्पष्ट आहे की ती एकतर नुकतीच बाईक चालवायला शिकली आहे किंवा ती शिकत आहे. मुलीने एक्सीलरेटर दाबताच गाडीचं पुढचं चाक पूर्णपणे हवेत उचलतं आणि दोन्ही मैत्रिणी खाली पडतात.

पडताना समोरच्या मुलीने स्वत:ला सांभाळलं मात्र मागे बसलेली तरुणी धाडकन आपटली. मात्र सुदैवाने तिने हेल्मेट घातले होते. यामुळे तिला जास्त दुखापत झाली नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या