JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! 101 म्हाताऱ्यांनी असं काही केलं की संपूर्ण जगाची हवा टाईट; पाहा थरारक VIDEO

OMG! 101 म्हाताऱ्यांनी असं काही केलं की संपूर्ण जगाची हवा टाईट; पाहा थरारक VIDEO

101 वृद्ध व्यक्तींनी असं करतब करून दाखवलं की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

101 वृद्धांचं अजब करतब (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पॅरिस, 21 एप्रिल :  जसजसं वय वाढू लागतं, तसतशा शारीरिक समस्याही उद्भवतात. चालणं, उठणं, बसणंही मुश्किल होतं. पण अशा वयात 101 वृद्धांनी असं काही करून दाखवलं आहे की संपूर्ण जग थक्क झालं आहे. वयस्कर व्यक्तींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल.  वय हा फक्त आकडा आहे हे या म्हाताऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. म्हातारपणात शरीराची ताकद कमी होते आणि ते तरुणांपेक्षा कमी सक्रिय राहतात. पण हे जगातल्या प्रत्येक ज्येष्ठावर तंतोतंत बसेलच असं नाही. असे बरेच लोक आहेत जे या वयाच्या टप्प्यातही असं काम करतात, की तरुणांनाही लाज वाटेल, असाच हा व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानांमधून काही लोक खाली उड्या मारताना दिसत आहेत. याला स्काय डायव्हिंग म्हणतात, हा एक साहसी खेळ आहे. यासाठी तुमचं हृदय स्ट्राँग असायला हवं. हजारो मीटर उंच उडणाऱ्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणं कुणालाही शक्य होत नाही. बहुतेक साहसी लोकही या खेळापासून दूरच राहतात. असाच खेळ या वयस्कर व्यक्ती खेळल्या आहेत. अंडरविअरबाबत महिलेची अजब गजब पोस्ट चर्चेत; सोशल मीडियावर तुफान व्हायरल या व्हिडीओत विमानातून उड्या मारणाऱ्या या व्यक्ती वयाची साठी ओलांडलेल्या आहेत. तब्बल १०१ सीनियर स्कायडायव्हर्सनी पाच वेगवेगळ्या विमानांमधून एकत्र उडी मारली. इतकंच नव्हे तर हवेत एकत्र येत त्यांनी ‘स्नोफ्लेक’ आकार तयार केला.  अमेरिकेतील कॅलिफोर्नियात त्यांनी हे करतब करून दाखवलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विमानातून खाली येताना त्यांचा वेग ताशी 194 किमी होता. हा व्हिडिओ ‘स्कायडायव्ह पॅरिस’ या इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील माहितीनुसार या वृद्धांनी असं करतब करत एकाच वेळी दोन रेकॉर्ड केले आहेत. पैसे नाही तर ‘या’ गोष्टीसाठी 93 वर्षीय महिला करतेय पार्टनरला डेट, कारण आश्चर्यचकीत करणारं त्यांचा हा थरारक व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या