जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अंडरविअरबाबत महिलेची अजब गजब पोस्ट चर्चेत; सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अंडरविअरबाबत महिलेची अजब गजब पोस्ट चर्चेत; सोशल मीडियावर तुफान व्हायरल

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

अंडरविअरबाबत महिलेने अशी पोस्ट केली आहे, की अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, कशावरून चर्चा होईल सांगू शकत नाही. अशाच एका चर्चेने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही चर्चा आहे चक्क अंडरविअरबाबत. एका महिलेने सोशल मीडियावर अंडरविअरबाबत अशी पोस्ट केली की ती तुफान व्हायरल होते आहे. त्यावर बऱ्याच कमेंटही येत आहे. अशी ही पोस्ट नेमकी आहे तरी काय? ते पाहुयात. महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या अंडरविअरबाबत ही पोस्ट केली आहे. तिच्या बॉयफ्रेंडची एक विचित्र सवय आहे, जी घाणेरडी असल्याचं तिने म्हटलं आहे. याबाबत तिने आपलं मत मांडत इतर लोकांनाही याबाबत एक प्रश्न विचारला आहे. महिलेच्या या प्रश्नाला बऱ्याच जणांनी उत्तरंही दिली आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

महिलेने रेडिट या सोशल मीडिया साइटवर ही पोस्ट केली आहे. रेडिटवर AskUK फोरमवर महिलेची ही पोस्ट आहे. झोपली होती व्यक्ती, अंडरविअरमध्ये अचानक काहीतरी हलू लागलं; आत डोकावताच फुटला घाम तुम्ही तुमची अंडरविअर आणि मोजे दररोज बदलता की जेव्हा अंघोळ करता तेव्हा? असा प्रश्न तिने विचारला आहे. आता हा असा प्रश्न पाहून तुम्ही गोंधळात पडला असेल. तिने असं का विचारलं, तिला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तुम्ही तिची सविस्तर पोस्ट वाचल्यावरच समजेल. महिला म्हणाली, “मी अंघोळ करो वा न करो पण माझे अंडरविअर आणि मोजे दररोज सकाळी बदलते. माझा पार्टनर मात्र जेव्हा तो अंघोळ करतो तेव्हाच अंडरविअर आणि मोजे बदलतो. मी दररोज बदलते ते त्याला विचिक्र वाटतं. आम्हा दोघांपैकी कोण योग्य आहे?”, असा सवाल तिने केला आहे. Women Hygiene : महिलांच्या पँटीवर पांढरा-पिवळा असा डाग का दिसतो? महिलेच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. बहुतेकांनी तिची बाजू घेतली आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडची सवय घाणेरडी असल्याचं म्हटलं आहे. तर कही जणांनी तिचा बॉयफ्रेंड दररोज अंघोळ करत नाही का? असा सवालही केला आहे.

Do you change your underwear and socks every day or every time you shower? by u/kvalentine2 in AskUK

जाहिरात

तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात