नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पाकिस्तानानं (Pakistan) शनिवारी ऐतिहासिक करतारपुर कॉरिडोरचे (Kartarpur Corridor) उद्घाटन केल्यामुळं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तर, दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी पाकनं पुन्हा येरे माझ्या मागल्या हा पवित्रा घेत नापाक खेळी केली. त्यामुळं भारतीयांकडून पुन्हा एकदा पाकवर टीका केली जात आहे. पाकिस्ताननं भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांची विकृतपणे कुचेष्टा केली. पाकनं नुकताच आपल्या युध्द स्मारकात अभिनंदन वर्धमान यांचा पुतळा उभा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी या पुतळ्यासोबत एक चहाचा कपही ठेवला आहे. पाकिस्तानची ही नापाक बाब पाकचे पत्रकार अनवर लोधी यांनी ट्वीट केली. त्यांनी अभिनंदनच्या पुतळ्याचा फोटो यात अपलोड केला आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फेब्रुवारीमध्ये भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या भुमीत अडकले होते. त्यानंतर पाकच्या सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले. यावेळी पाकनं एक व्हिडीओ शेअर केला होता, यात अभिनंदन यांच्या हातात चहाचा कप होता, आणि ते चहाचा लाभ घेत आहेत असे भासवण्यात आले होते. त्यावेळी अभिनंदन यांच्याकडून माहिती काढून घेण्याचे काम पाकचे अधिकारी करत होते, त्यानंतर त्यांनी चहा कसा आहे असे विचारले होते. तेव्हा अभिनंदन यांनी, “चाय खुप चांगला आहे. धन्यवाद”, असे सांगितले होते. वाचा- नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO
सोशल मीडियावर अभिनंदन यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एकीकडे भारताकडून पाकचे कौतुक होत असताना पुन्हा त्यांच्या अशा मस्करीनं टीका केली जात आहे. याआधी पाकनं अभिनंदन यांच्या सारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा वापर चहाच्या जाहीरातीसाठी केला होता. त्यामुळं पुन्हा एकदा पाकनं अभिनंदन यांची खालच्या पातळीवर मस्करी केली आहे. वाचा-
अबब…स्विस बँकेत भारतीयांचे 300 कोटी पडून, दावा सांगणारं कुणीच नाही
वाचा-
वय 15 वर्ष 258 दिवस, सामने फक्त 5 आणि मोडला सचिनचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम! भारतानं बालाकोटमध्ये फेब्रुवारीत एअक स्ट्राईक केला होता. वायुसेनेनं यावेळी पाकमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा केला होता. मात्र भारताचे लढाऊ विमान एफ-16 पाकच्या हद्दीत अडकले. यात विंग कमांडर अभिनंदन यांचा समावेश होता. अभिनंदन यांचे विमान क्रॅश झाल्यानंतर त्यांना पाकच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. 1 मार्च रोजी अभिनंदन यांचा पुन्हा भारतात पाठवण्यात आले होते.