अबब...स्विस बँकेत भारतीयांचे 300 कोटी पडून, दावा सांगणारं कुणीच नाही

अबब...स्विस बँकेत भारतीयांचे 300 कोटी पडून, दावा सांगणारं कुणीच नाही

स्विझरलँडच्या बँकांमध्ये भारतीयांची अशी 12 निष्क्रिय खाती आढळी असून त्यावर गेल्या काही वर्षात कुणीही दावा सांगितलेला नाहीये.

  • Share this:

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : स्विझरलँडच्या बँकेत (Swiss Banks)  असलेला काळा पैसा हा भारतात कायम चर्चेचा मोठा विषय असतो. या बँकेत भारतीयांचे हजारो कोटी रुपये असून ते भारतात परत आणता येऊ शकतात असं आश्वासन अनेक पक्षांनी दिलं होतं. मात्र ते काही पूर्ण होऊ शकलं नसलं तरी केंद्र सरकारने त्याला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात काळा पैसा जमा होण्यात घटही झाल्याचं बोललं जातंय. स्विझरलँडच्या बँकांमध्ये भारतीयांची अशी 12 निष्क्रिय खाती आढळी असून त्यावर गेल्या काही वर्षात कुणीही दावा सांगितलेला नाहीये. त्यामुळे ते सर्व पैसे सरकारच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे.

Ayodhya Verdict : एका अटकेमुळे वाढली भाजपची राजकीय उंची

स्विझरलँड सरकारने 2015 पासून त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या बँक खात्यांची माहिती द्यायला सुरूवात केली असून त्यात अनेक भारतीय आणि अनिवासी भारतीयांची नावंही पुढे आली आहेत. त्यातल्या अनेक खात्यांचा काहीही अता-पता लागलेला नाही. त्यामुळे स्विस सरकारने 6 वर्षांपूर्वी अशा 12 खात्यांवर कुणाचा दावा असेल तर तो त्यांनी करावा अशी सूचना केली होती.

शिखर धवननं स्वीकारलं अक्षयचं #BalaChallenge शेअर केला धम्माल VIDEO

त्यानंतर कोही लोकांनी दावेही केले होते मात्र त्यांच्याकडे आवश्यक ती ठोस कागदपत्र नसल्याने त्या सर्वांचे दावे फेटाळण्यात आले होते. काही खात्यांवर दावे करण्यासाठी अंतिम मुदत ही फक्त काही महिनेच शिल्लक असून काही खात्यांसाठी 2020 पर्यंत दावे करता येणार आहेत.

मात्र त्यावर दावा सांगण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्यानं हे सगळे पैसे स्विझरलँड सरकारच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. या सर्व खात्यांमध्ये 300 कोटींची रक्कम असल्याची माहितीही दिली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या