JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / Railway Seat Reservation : रेल्वेत लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर जाणून घ्या सुरक्षित अन् आरामदायी प्रवासासाठी काही महत्त्वाचे नियम

Railway Seat Reservation : रेल्वेत लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर जाणून घ्या सुरक्षित अन् आरामदायी प्रवासासाठी काही महत्त्वाचे नियम

देशभरातील अनेक प्रवासी सर्वांत आधी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु महिना, दीड महिना आधी आरक्षण (Railway Seat Reservation) करूनही कन्फर्म सीट मिळत नसल्याची परिस्थिती असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑगस्ट : देशभरातील अनेक प्रवासी सर्वांत आधी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु महिना, दीड महिना आधी आरक्षण (Railway Seat Reservation) करूनही कन्फर्म सीट मिळत नसल्याची परिस्थिती असते. अनेकदा तर कन्फर्म सीट मिळाल्यानंतरही रिझर्व्हेशनच्या डब्यात इतर प्रवासी आल्याने अडचण निर्माण होते. सेकंड क्लास स्लीपरच्या डब्यात हा अनुभव नेहमी येतो. एसीच्या डब्यात (AC Coach) मात्र एखाद्या प्रवाशाला मधलं सीट म्हणजेच मधला बर्थ (Middle Berth) मिळाला तर त्याला जास्त त्रास सहन करावा लागतो.

कारण खालचा बर्थ असणारा प्रवासी रात्री उशिरापर्यंत बसून राहत असल्यास मधल्या बर्थवरील प्रवाशाला इच्छा असूनही आराम करता येत नाही. परंतु, रेल्वे विभागाच्या नियमानुसार, रात्री 10 वाजेनंतर मधल्या बर्थचा प्रवासी सीट वर करून आराम करू शकतो. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

हे ही वाचा :  Meghdoot App : शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप आता नव्या रुपात

संबंधित बातम्या

रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलं आहे. लांब पल्ल्यासह जवळपासच्या गावांना जोडणारी रेल्वे सेवा सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाला सर्वाधिक पसंती दिली जाते. प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडून नियमांमध्ये बदल किंवा नवीन नियम लागू केले जातात. त्यामुळे या नियमांची सर्वांना माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं.

झोपला असाल तर तुम्हाला जागं करून टीटीईही तपासू शकत नाही तिकीट

जाहिरात

रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर तुम्ही बर्थवर जाऊन आराम करण्यास प्राधान्य देता. अनेकदा गाडीत तुम्हाला गाढ झोप लागते आणि टीटीई तिकीट तपासण्यासाठी उठवतो. अशा वेळी तुम्हाला राग येणं अपेक्षित आहे. पण झोपेत असताना तुम्हाला जागं करून टीटीई तुमचं तिकीट तपासू शकत नाही. प्रवास आरामदायी असायला हवा म्हणून नियमानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेदरम्यान टीटीईला तुमचं तिकीट तपासता येत नाही. परंतु, रात्री 10 वाजेनंतर तुमचा प्रवास सुरू होत असेल तर हा नियम लागू होत नाही.

जाहिरात

खालचा आणि मधला बर्थ असणाऱ्यांचीही होते अडचण

थ्री टियर कोच म्हणजेच थर्ड एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना मधल्या बर्थमुळे अनेकदा अडचण निर्माण होते. खालचा बर्थ असणारा प्रवासी रात्री उशिरापर्यंत बसून राहतो त्यामुळे मधला बर्थ असलेल्या व्यक्तीला आराम करता येत नाही. तर कधी मधल्या बर्थवरची व्यक्ती बसून राहिल्याने लोअर बर्थच्या व्यक्तीला झोपता येत नाही. ही बाब लक्षात घेऊनच रेल्वे विभागाने रात्री 10 नंतर बर्थ लावण्याचा नियम केलेला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Vegetables Rate Hike: आता भाज्यांमुळे घरखर्चाचं बजेट कोलमडणार, आठवडाभरात भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ

या नियमांचा देता येईल दाखला

रेल्वेत लांब पल्ल्याचा प्रवास करताना विभागाचे नियम माहिती असायला हवेत. त्यामुळे आरामदायी प्रवासात कुठलीही अडचण उदभवणार नाही. रेल्वेच्या नियमानुसार, रात्री 10 वाजता मधला बर्थ लावता येतो. तो सकाळी 6 वाजेपर्यंत खाली केला नाही तरीही चालतं. समजा तुमचा खालचा बर्थ असेल तर रात्री 10 वाजेनंतर मधल्या किंवा वरच्या बर्थवरचा प्रवासी खालच्या बर्थवर बसू शकणार नाही. म्हणजे त्यानंतर तुम्हीही खालच्या बर्थवर पाय आडवे करून झोपू शकता.

जाहिरात

रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास म्हणून ओळखला जातो. परंतु, नियम माहिती नसल्याने तडजोड करून त्रास सहन करण्याची वेळही अनेक प्रवाशांवर येऊ शकते. त्यामुळे नियम माहिती करून घेतल्यास लांबच्या प्रवासाची अडचण दूर करता येऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या