मुंबई, 25 ऑगस्ट : महागाईची झळ सोसत असलेल्या नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहे. येत्या काळात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना भाज्यांसाठी आता जास्तीचा खिसा रिकामा करावा लागणार आहे.
पालेभाज्याचे दर दुप्पट
नवी मुंबई एपीएमसीमधील दरानुसार, पालक, मेथी, कोंथिबीर यांचे दर गेल्या आठवड्यात 60 ते 80 रुपयांपर्यंत होते. मात्र हे दर वाढून आता 200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या भाज्या खरेदी कराव्या की नाही असा प्रश्न सर्वसमान्यांसमोर आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे भाज्यांची उत्पादन घटलं आहे. उत्पादन घटल्याने भाज्यांची आवकही कमी झाली आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर कडाडले आहेत.
भाज्यांचे दर किती वाढले?
भाज्या | आताचे दर | आठवडाभर आधीचे दर |
पालक | 200 रुपये | 80 रुपये |
मेथी | 160 रुपये | 80 रुपये |
वांगी | 120 रुपये | 60 रुपये |
कारली | 120 रुपये | 80 रुपये |
फुलकोबी | 120 रुपये | 80 रुपये |
टोमॅटो | 60रुपये | 30 रुपये |
कोथिंबीर | 200रुपये | 80 रुपये |
शिमला मिरची | 120 रुपये | 100 रुपये |
*नवी मुंबई एपीएमसीमधील दर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.