पुढील वर्षी सुट्ट्याच सुट्या! आत्ताच करा लाँग वीकेंडचं नियोजन, वर्ष होईल यादगार
मुंबई, 4 डिसेंबर: डिसेंबर महिना सुरु झाला आहे. 2022 हे वर्ष मावळतीकडं झुकलं आहे. नवीन वर्ष 2023 सुरु व्हायला आता काहीच दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष प्रत्येकासाठीच नवीन ऊर्जा आणि आव्हानं घेऊन येतं. प्रत्येकजण आपापल्या परिनं नवीन वर्षात काय करायचं, याचं प्लॅनिंग करत असतो. काही लोक आपल्या जुन्या सवयी सोडून जीवनात पुढं जाण्यासाठी चांगल्या गोष्टी अंगीकारण्याचा संकल्प करतात. नवीन वर्ष सुरु होताना या वर्षात नेमकं काय करायचं, याबाबत प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असू शकतो. पण या दरम्यान एक गोष्ट सर्वांसाठी समान असते, ती म्हणजे लाँग वीकेंडचं नियोजन… प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात विश्रांतीची गरज असते. कामाच्या धबडग्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्यावा, असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी उपयोगी ठरतात, त्या सुट्ट्या… येत्या वर्षातही तुम्हाला जवळजवळ प्रत्येक महिन्याला भरपूर मोठ्या सुट्ट्या मिळणार आहेत. जर तुम्ही तुमच्या सुट्ट्या नियोजनबद्ध पद्धतीनं वापरल्या, तर तुमच्यासारखे नशिबवान तुम्हीच…नवीन वर्षाच्या कॅलेंडरकडं पाहिलं तर तुम्ही या अनेक ठिकाणी 2-3 दिवसांच्या सुट्ट्यांचं रुपांतर 4-6 दिवसांच्या लांब सुट्ट्यांमध्ये करू शकता. हेही वाचा: नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ‘या’ आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा करा प्रयत्न लागून येण्याऱ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी (डिसेंबर 2022 - जानेवारी 2023): 31 डिसेंबर 2022, शनिवार 1 जानेवारी, रविवार: नवीन वर्ष जर तुम्ही 30 डिसेंबर 2022, शुक्रवार किंवा 2 जानेवारी 2023 म्हणजेच सोमवारी सुट्टी घेतली तर तुम्हाला 4 दिवसांची सुट्टी मिळू शकते. जानेवारी 2023: 14 जानेवारी, शनिवार: लोहरी, मकर संक्रांत 15 जानेवारी, रविवार: पोंगल जर तुम्ही 13 जानेवारी, शुक्रवार किंवा 16 जानेवारी, सोमवारी सुट्टी घेतली तर तुम्हाला 4 दिवसांची सुट्टी मिळेल. 26 जानेवारी, गुरुवार: प्रजासत्ताक दिन 28 जानेवारी, शनिवार 29 जानेवारी, रविवार तुम्ही 27 जानेवारी, शुक्रवारी सुट्टी घेतल्यास, तुम्हाला 4 दिवसांची सुट्टी असेल. फेब्रुवारी 2023: 18 फेब्रुवारी, शनिवार: महाशिवरात्री 19 फेब्रुवारी, रविवार जर तुम्ही 17 फेब्रुवारी, शुक्रवार किंवा 20 फेब्रुवारी, सोमवारी एक दिवस सुट्टी घेतली तर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये देखील 3 दिवस सुट्टी मिळेल. मार्च 2023: 8 मार्च, बुधवार- होळी 11 मार्च, शनिवार 12 मार्च, रविवार या दरम्यान, जर तुम्ही 9 आणि 10 मार्चला सुट्टी घेतली तर तुम्हाला 5 दिवसांची लाँग वीकेंडची सुट्टी मिळेल. एप्रिल 2023:
दरम्यान, जर तुम्ही 5 आणि 6 एप्रिलला सुट्टी घेतली तर तुम्हाला 6 दिवसांची मोठी सुट्टी मिळेल. मे 2023:
या काळात जर तुम्ही 4 मे, गुरुवारी टेक ऑफ केला तर तुम्हाला 4 दिवसांची वीकेंडची सुट्टी मिळेल. जून 2023:
तुम्ही 19 जून, सोमवारी रजा घेतल्यास चार दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
या दरम्यान, जर तुम्ही शुक्रवार, 30 जून रोजी सुट्टी घेतली तर तुम्ही 4 दिवसांच्या वीकेंडचा आनंद घेऊ शकता. ऑगस्ट 2023: ऑगस्टमध्ये, तुम्हाला दोनदा 5-5 दिवस लांब सुट्टी घेण्याची संधी आहे.
दरम्यान, सोमवार, 14 ऑगस्टला सुट्टी घेतल्यास तुम्हाला 5 दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
या महिन्यात 5 दिवसांची रजा घेण्याची ही दुसरी संधी आहे. तुम्हाला फक्त सोमवार, 28 ऑगस्ट रोजी सुट्टी घ्यायची आहे आणि तुम्ही ती 5 दिवसांच्या सुट्टीत बदलू शकाल. सप्टेंबर 2023:
जर तुम्ही 8 सप्टेंबर, शुक्रवारी सुट्टी घेतली तर तुम्ही 4 दिवसांचा वीकेंड एन्जॉय करू शकता.
या दरम्यान, जर तुम्ही सोमवार, 18 सप्टेंबर रोजी सुट्टी घेतली तर तुम्ही ती 4 दिवसांच्या सुट्टीमध्ये बदलू शकाल. सप्टेंबर-ऑक्टोबर 2023
29 सप्टेंबर, शुक्रवार किंवा 3 ऑक्टोबर, मंगळवारला तुम्ही सुटी घेतल्यास, तुम्हाला 4 दिवसांच्या सुट्या मिळतील. ऑक्टोबर 2023-
जर या काळात तुम्ही 23 ऑक्टोबरला सुट्टी घेतली तर तुम्हाला 4 दिवस सुट्टीचा आनंद लुटण्याची संधी मिळेल. नोव्हेंबर 2023-
जर तुम्ही 10 नोव्हेंबर, शुक्रवार किंवा 14 नोव्हेंबर, मंगळवारी सुटी घेतली तर तुम्हाला 4 दिवस सुट्टी मिळेल.
या दरम्यान, जर तुम्ही 24 नोव्हेंबर, शुक्रवार किंवा 28 नोव्हेंबर मंगळवारला सुट्टी घेतली तर तुम्ही 4 दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकाल.
डिसेंबर 2023:
या 2023 च्या शेवटच्या दीर्घ सुट्ट्या असतील, जिथे तुम्ही 22 डिसेंबर, शुक्रवार किंवा 26 डिसेंबर, मंगळवारला सुट्टी घेऊन 4 दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकाल.