मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून 'या' आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा करा प्रयत्न

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून 'या' आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा करा प्रयत्न

Healthy lifestyle

Healthy lifestyle

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करू शकता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 डिसेंबर : सध्याच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात अनेकांचं आपल्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष होत आहे. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, कमी झोप, सततचा मानसिक व शारिरीक ताण, व्यायामाचा अभाव या कारणांमुळे अनेक समस्यांचा समाना करावा लागत आहे. निरोगी राहण्यासाठी आपली जीवनशैली योग्य असणं गरजेचे आहे. त्यासाठी फिटनेस, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित सवयी सुधारल्या पाहिजेत. जर तुम्ही आतून तंदुरुस्त असाल आणि सर्व आरोग्यदायी सवयींचे पालन करत असाल, तर तुम्हाला कोणत्याही आजाराचा लवकर धोका जाणवणार नाही. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करू शकता. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नवीन वर्षाचा संकल्प म्हणून तुम्ही पुढील सवयी अंगीकारू शकता:

1) आहारामध्ये सुधारणा करा: सर्व वयोगटातील व्यक्तींना बाहेरचे चमचमीत पदार्थ खायलं आवडतं. मात्र, या खाद्यपदार्थांमुळे अनेक आजार होत आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी आपल्या आहारात काही बदल केले पाहिजे. तेलकट, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळले पाहिजेत. त्याऐवजी फळं आणि भाज्यांना आहाराचा मोठ्या प्रमाणात समावेश करा.

2) झोपेचं चक्र सुरळीत करा: धावपळीच्या जीवनामुळं अनेकांचे झोपेचं चक्र बिघडलेलं आहे. उशिरा झोपणं ही अनेकांची सवय बनली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होतो. निरोगी शरीरासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच दररोज सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे.

हेही वाचा - Right Time To Eat Curd : दही खाण्याची योग्य वेळ कोणती, जेवणापूर्वी की जेवणानंतर?

3) सकाळी उठल्यानंतर पाणी प्या: मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर दोन किंवा तीन ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. आपण दिवसभरात पाण्यापेक्षा चहा, कॉफी आणि इतर पेयांना पसंती देतो. हे टाळलं पाहिजे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणं आवश्यक आहे.

4) मेडिटेशन: व्यस्त जीवनशैलीत माणसाला स्वतःसाठीच वेळ नाही. तीन पैकी एक व्यक्ती तणावात जगत आहे. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मेडिटेशन केलं पाहिजे.

5) स्वच्छता बाळगा: कोविड-19 महामारीनंतर, आपल्या जीवनात स्वच्छतेचं महत्त्व फार वाढलं आहे. स्वच्छतेमध्ये केवळ घराची साफसफाई नाही तर इतर अनेक गोष्टींच्या स्वच्छतेचा समावेश होतो. काहीही खाताना किंवा पिताना आपण हात धुतले पाहिजेत. याशिवाय तुमच्या वैयक्तिक स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे.

वरील पाच सवयींचा अवलंब करून तुम्ही नवीन वर्षात निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू शकता.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle