‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त गृहकर्ज
मे महिन्यापासून गृहकर्जाचे व्याजदर सातत्याने वाढत आहेत.
रिझव्र्ह बँकेने सप्टेंबरमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केल्याने ते आणखी वाढणार आहेत.
रेपो दरात वाढ झाल्याचा सर्वात मोठा परिणाम कर्ज आणि त्याचे दर वाढण्यावर दिसून येतो.
या महागाईच्या काळात ग्राहकांना सर्वात स्वस्त गृहकर्ज कोठे उपलब्ध आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
चला तर मग जाणून घेऊया त्या 5 बँकांबद्दल ज्या स्वस्तात कर्ज देत आहेत.
1-करूर वैश्य बँकेचा रेपो लिंक्ड कर्ज दर 9% आहे.
या बँकेचा गृहकर्जावरील किमान व्याजदर 8.05 टक्के तर आणि कमाल व्याज दर 10.25 टक्के आहे.
2-HDFC बँकेचा रेपो लिंक्ड कर्ज दर 8.1 टक्के आहे.
या बँकेचा गृहकर्जावरील किमान व्याजदर 8.05 टक्के तर आणि कमाल व्याज दर 10.25 टक्के आहे.
3- कर्नाटक बँकेचा रेपो लिंक्ड कर्ज दर 7.95 टक्के आहे.
या बँकेचा गृहकर्जावरील किमान व्याजदर 8.24 टक्के तर आणि कमाल व्याज दर 9.59 टक्के आहे.
4-युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा रेपो लिंक्ड कर्ज दर 8.7 टक्के आहे.
या बँकेचा गृहकर्जावरील किमान व्याजदर 8.25 टक्के तर आणि कमाल व्याज दर 10.1 टक्के आहे.
5- बँक ऑफ महाराष्ट्रचा रेपो लिंक्ड रेपो दर 8.7 टक्के आहे.
या बँकेचा गृहकर्जावरील किमान व्याजदर 8.3 टक्के तर आणि कमाल व्याज दर 9.7 टक्के आहे.