नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : Youtube Music आता आपल्या फ्री युजर्ससाठी केवळ ऑडिओ ऐकण्याचा पर्याय देणार आहे. फ्रीमध्ये Youtube Music वापरणारे युजर्स आता म्युझिकसह व्हिडीओ पाहू शकणार नाहीत. हा बदल केवळ Youtube Music साठीच झाला आहे. एका पोस्टद्वारे कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. ज्या युजर्सनी यूट्यूब प्रीमियम सब्स्क्राईब केलं नाही, ते ऑन-डिमांड म्युझिक ऐकू शकणार नाही. तसंच अनलिमिटेड स्किप करू शकणार नाही. युजर्स Youtube Music वर डेडिकेटेड मूड मिक्स ऐकू शकतात. 9to5Google ने दिलेल्या माहितीनुसार, फ्री युजर्सने जर एखादं गाण डाउनलोड केलं असेल, तर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑन-डिमांड ऐकू शकतील. फ्री युजर्सला काय मिळतील सुविधा - फ्रीमध्ये Youtube Music App चा वापर करणारे युजर्स बॅकग्राउंडमध्ये गाण्याचा आनंद घेऊ शकतात, परंतु जाहिरातींसह पर्सनलाइज्ड मिक्स ऐकू शकतात. Youtube Music वर इतर गाणी आणि प्लेलिस्ट ऐकू शकतील.
प्रीमियम युजर्स - ज्या युजर्सनी प्रीमियम सब्स्क्रिप्शन घेतलं आहे, ते फ्रीहून अधिक फायदा घेऊ शकतात. यात अनलिमिटेड ऑन-डिमांड गाणी ऐकू शकतील. यूट्यूब म्युझिकवर व्हिडीओ पाहता येईल, तसंच गाणी स्किपही करता येतील, हे सर्व जाहिरातींशिवाय करता येईल. 3 नोव्हेंबरपासून हे बदल कॅनडामध्ये रोलआउट होणार आहेत. भारतात हा बदल कधी रोलआउट होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, जगभरातील अनेक अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर (Android Smartphone) YouTube सपोर्ट बंद झालं आहे. गुगलने याबाबतची माहिती आपल्या वेबसाईटवर दिली आहे. गुगलच्या या निर्णयानंतर Android 2.3 वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईसवर गुगल अकाउंट सुरू राहणार नाही. युजर्सने योग्य डिटेल्स भरले, तरी युजरनेम आणि पासवर्ड Error दिसेल.