नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : Vivo ने चीनमध्ये नव्या X-Series फोनची घोषणा केली आहे. Vivo X70 सीरिजमध्ये तीन डिव्हाईस स्टँडर्ड X70, X70 Pro आणि X70 Pro+ सामिल आहे. Vivo X70 Pro+ या फोनला चार कॅमेरासह, जबरदस्त बॅटरी, वॉटरप्रुफ डिप्स्ले आणि इतरही जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. Vivo X70 Pro+ स्पेसिफिकेशन्स - - 6.78 इंची 2K (3200 x 1440) डिस्प्ले - स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर - LPDDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज - 4500mAh बॅटरी - 55W फ्लॅश वायर्ड चार्जिंग सपोर्ट - 50W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग - कूलिंगसाठी रियरवर एयर वेंट्स आणि फ्रंटमध्ये ब्रीदिंग लाइट - Android 11 OS
कॅमेरा - या फोनला चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनयुक्त आहेत. सेंसरमध्ये 360° हॉरिजॉन्टल लेवलिंग स्टेबिलाइजेशनसह 48MP माइक्रो-पॅन-टिल्ट अल्ट्रावाइड अँगल कॅमरा आहे. रेकॉर्डिंगवेळी फोन फिरवला तरी एक स्थिर व्हिडीओच याद्वारे मिळेल. एक कॅमेरा 50MP सॅमसंग GN1 मुख्य कॅमेरा, दुसरा 12MP Sony IMX663 पोर्ट्रेट कॅमरा आणि 8MP टेलिस्कोप कॅमेरा आहे, जो 5x ऑप्टिकल झूम आणि 60x सुपर झूम होतो.
Vivo X70 Pro+ च्या 8GB RAM + 256GB वेरिएंटची किंमत जवळपास 62,636 रुपये इतकी आहे. 12GB RAM + 256GB वेरिएंटची किंमत 68,297 रुपये आणि 12GB RAM + 512GB वेरिएंटची किंमत 79,692 रुपये इतकी आहे. या फोनसोबत Vivo TWS 2 ANC इयरबड्स मोफत दिले जाणार आहेत.