मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Mobile Charging रात्रभर सुरू ठेवलं तर काय होतं? नेमका कधी आणि किती वेळ चार्ज करावा मोबाईल?

Mobile Charging रात्रभर सुरू ठेवलं तर काय होतं? नेमका कधी आणि किती वेळ चार्ज करावा मोबाईल?

मोबाइल (Mobile) ही प्रत्येकाची दैनंदिन गरज बनली आहे. आता बहुतांश कामं ऑनलाइन (Online) आणि त्यातही मोबाइलवर होत असल्यानं मोबाइल युझर्सचं प्रमाणही लक्षणीय वाढलं आहे.

मोबाइल (Mobile) ही प्रत्येकाची दैनंदिन गरज बनली आहे. आता बहुतांश कामं ऑनलाइन (Online) आणि त्यातही मोबाइलवर होत असल्यानं मोबाइल युझर्सचं प्रमाणही लक्षणीय वाढलं आहे.

मोबाइल (Mobile) ही प्रत्येकाची दैनंदिन गरज बनली आहे. आता बहुतांश कामं ऑनलाइन (Online) आणि त्यातही मोबाइलवर होत असल्यानं मोबाइल युझर्सचं प्रमाणही लक्षणीय वाढलं आहे.

मुंबई, 11 सप्टेंबर : मोबाइल (Mobile) ही प्रत्येकाची दैनंदिन गरज बनली आहे. आता बहुतांश कामं ऑनलाइन (Online) आणि त्यातही मोबाइलवर होत असल्यानं मोबाइल युझर्सचं प्रमाणही लक्षणीय वाढलं आहे. मोबाइल वापरताना त्याच्या अन्य अॅक्सेसरिजचा वापरही तितकाच काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे. काही युझर्स दिवसभर मोबाइल वापरून रात्रीच्या वेळी तो चार्जिंगला (Charging) लावून झोपतात. त्यामुळे रात्रभर मोबाइल चार्जिंगला राहतो. काही युझर्स दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मोबाइल चार्जिंग करतात. मोबाइल नेमका कधी आणि किती वेळ चार्ज करावा, रात्रभर मोबाइल चार्ज केल्यानं त्यातल्या बॅटरीवर परिणाम होतो का, बॅटरी लवकर खराब होते का, बॅटरीचा स्फोट होऊ शकतो का असे अनेक प्रश्न युझर्सना नेहमीच पडत असतात. परंतु, अलीकडच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये अशी खास यंत्रणा असते, की ती फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीजपुरवठा बंद करते. असं असलं तरी युझर्सनी दररोज रात्रभर मोबाइल चार्जिंगला लावू नये, असं जाणकार सांगतात. अनेक युझर्स रात्रभर मोबाइल चार्जिंगला लावतात आणि दिवसभर त्याचा वापर करतात; मात्र मोबाइलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास नक्कीच लागत नाहीत. चार्जिंग पूर्ण झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवल्यास यापूर्वीच्या मोबाइल फोनमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. परंतु, अलीकडच्या स्मार्टफोनमध्ये विशिष्ट यंत्रणा असल्याने असं होण्याची शक्यता जवळपास नसते. चार्जिंगच्या वेळी मोबाइल गरम झाला तर काही युझर्स घाबरतात. परंतु, ही भिती व्यर्थ असते. जाणकारांच्या मते, लिथियम आयन बॅटरीत (Battery) चार्जिंगदरम्यान रासायनिक क्रिया होतात. बॅटरीतल्या पॉझिटिव्ह (+) चेंबरमधले आयन निगेटिव्ह (-) चेंबरकडे प्रवाहित होतात. त्यामुळे बॅटरी गरम होते. तसंच मोबाइलची पाठीमागची बाजू गरम होते. यात भीतीचं काहीच कारण नसतं. सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग सर्किट (Circuit) बसवण्यात आलेलं असतं. त्यामुळे जेव्हा बॅटरी पूर्ण म्हणजेच 100 टक्के चार्ज होते तेव्हा वीजपुरवठा घेणं बंद करते. बहुतांश स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर (Snapdragon Processor) असतो. हा प्रोसेसर स्मार्ट (Smart) असतो. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर हा प्रोसेसर चार्जिंग बंद करतो. बॅटरी जेव्हा 90 टक्क्यांवर येते तेव्हा पुन्हा चार्जिंग सुरू होतं. त्यामुळे एखाद्या दिवशी रात्रभर चुकून स्मार्टफोन चार्जिंगला तसाच राहिला तरी काळजी करण्याचं कारण नाही. परंतु, रात्रभर मोबाइल चार्जिंग सुरू न ठेवणं अधिक श्रेयस्कर असल्याचं जाणकार सांगतात.
First published:

Tags: Mobile, Smartphone

पुढील बातम्या