नवी दिल्ली, 10 डिसेंबर : Facebook सर्वाधिक पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. अनेक जण तासंतास फेसबुकवर वेळ घालवतात. सर्वच जण तुमचे फेसबुकवर फ्रेंड्स नसतात, परंतु ते तुमचं फेसबुक प्रोफाइल नकळत, लपून पाहू शकतात. फेसबुकवर असे अनेक जण तुमचं प्रोफाइल नकळत पाहतात. प्रोफाइल पाहणाऱ्या युजर्सबाबत कंपनी माहिती देत नाही. परंतु तुम्ही काही ट्रिकने तुमचं प्रोफाइल कोण पाहतंय यांची माहिती मिळवू शकता. ही पद्धत एक्सपर्ट्सकडून फुलप्रूफ मानली जात नाही. परंतु याद्वारे तुम्ही काही प्रमाणात तुमचं प्रोफाइल पाहणाऱ्यांची माहिती मिळवण्यास मदत करतं. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज लागत नाही. Facebook Profile कोणी पाहिलं याबाबत वेबद्वारे माहिती मिळवता येवू शकते. त्यासाठी तुम्हाला कंप्यूटरची गरज लागेल. - सर्वात आधी Facebook Account एखाद्या डेस्कटॉप ब्राउजरवर ओपन करावं लागेल.
- Facebook ओपन केल्यानंतर ज्यावेळी पेज किंवा टाइमलाइनवर असाल, त्यावेळी राइट-क्लिक करा. यात ऑप्शन्समध्ये View Page Source सिलेक्ट करा. यामुळे तुमचा Facebook सोर्स ओपन होईल. - पेज सोर्स ओपन झाल्यानंतर ctrl+f वर टॅप करा. त्यानंतर सर्च बार समोर येईल. या सर्च बारमध्ये BUDDY_ID टाइप करुन एंटर करा. यात अनेक फेसबुक आयडी येतील. BUDDY_ID शिवाय इथे अशा युजर्सचंही नाव असतील, ज्यांनी तुमचं प्रोफाइल व्हिजीट केलं आहे.
- नाव न दिसता केवळ BUDDY_ID दिसत असल्यास, तुम्ही नाव पाहण्यासाठी BUDDY_ID कॉपी करा. त्यानंतर नव्या टॅबमध्ये Facebook.com/BUDDY_ID देवून सर्च करा. यानंतर युजरचं प्रोफाइल ओपन होईल. BUDDY_ID च्या जागी कॉपी केलेला कोड पेस्ट करा. त्यानंतर तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर कोणी व्हिजीट केलं याची माहिती मिळेल.