युजर्सची अॅक्टिव्हिटी ट्रॅक केली जात नसल्याचा दावा Facebook ने केला आहे. परंतु अनेकदा युजरने एखादी गोष्ट ई-कॉमर्स साइटवर सर्च केली किंवा एखाद्या व्यक्तीशी वस्तूबाबत चर्चा केली, तर त्याच वस्तूच्या जाहिराती तुमच्या फेसबुक अकाउंटवर दिसू लागतात. त्यामुळे ट्रॅकिंग केलं जात असल्याचं लक्षात येतं.
|
1/ 7
फेसबुकने तुमची Online Activity जाणून घेऊ नये, यासाठी फेसबुकपासून तुमच्या अॅक्टिव्हिटी डिस्कनेक्ट करण्यासाठी सेटिंगमध्ये काही बदल करता येऊ शकतात.
2/ 7
सर्वात आधी आपल्या Facebook Account वर लॉगिन करुन Setting-Privacy पेजवर जा.
3/ 7
त्यानंतर Settings वर क्लिक करा. आता डावीकडे असलेल्या कॉलममधील Your Facebook Information वर क्लिक करा.
4/ 7
आता Off Facebook Activity वर क्लिक करा.
5/ 7
More वर क्लिक करून Manage Future Activity हा पर्याय निवडा.
6/ 7
इथे तुम्हाला फेसबुक पासवर्ड विचारला जाईल. त्यावर पासवर्ड एंटर करा. यानंतर तुम्हाला एक पॉप-अप पेज दिसेल.
7/ 7
Manage Future Activity या पर्यायावर क्लिक करा आणि Off Facebook Activity बंद करा.