नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : WhatsApp ने अनेक नवे फीचर्स आणले आहेत, त्यापैकी काही फीचर्सचं टेस्टिंग सुरू आहे. आता WhatsApp आणखी नवे फीचर आणणार आहे. युजर्सला हाय क्वालिटी फोटो पाठवण्यापासून चांगला प्रायव्हसी कंट्रोल मिळणार आहे. High Quality WhatsApp Photo - WhatsApp वर सध्या जे काही फोटो पाठवले जातात, ते कंप्रेस होऊन कमी साइजचे होतात. त्यासोबत त्या फोटोची क्वालिटीही खराब होते. युजर्सची हीच समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर नवं फीचर येणार आहे. याद्वारे युजर्स फोटो-व्हिडीओ पाठवताना 3 मोड्स बेस्ट क्वालिटी, डेटा सेवर आणि ऑटो असे पर्याय देणार आहे.
Privacy Control - युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता, व्हॉट्सअॅपवर Last seen, profile photo आणि status लपवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आता My contacts, Everyone आणि Nobody असा पर्याय निवडता येतो. आता आणखी एक नवा पर्याय येणार आहे. ‘My contacts except’ असा पर्याय येणार असून याद्वारे युजर्स आपले डिटेल्स कोणत्या कॉन्टॅक्टने पाहावे आणि कोणत्या नाही हे ठरवू शकतील.
Stickers - व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स पाठवण्याचा ट्रेंड वाढतो आहे. अशात इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर नवं फीचर येणार आहे. नवं फीचर युजरला आपले फोटो स्टिकर्स स्वरुपात पाठवण्याची सुविधा देईल. यासाठी एक बटण दिलं जाईल, जे फोटो रुपात पाठवण्याप्रमाणे स्टिकर्स रुपात बदलेल. ही सुविधा व्हॉट्सअॅपच्या नव्या वर्जनमध्ये येण्याची शक्यता आहे. End-to-end encrypted backups - WhatsApp ने एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप (End-to-end encrypted backups) पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. लवकरच हे फीचर युजर्ससाठी प्रायव्हसी आणि सिक्योरिटी प्रोटेक्शनच्या अतिरिक्त लेअरला रोलआउट करण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणे इतर कोणतीही मेसेजिंग सेवा अशी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप सुविधा युजर्सच्या सुरक्षेसाठी देऊ शकत नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
जे युजर्स आपल्या चॅट हिस्ट्रीचा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह बॅकअपचा पर्याय निवडतात, त्यांचा बॅकअप इतर कोणीही अनलॉक करू शकत नाही. कंपनीदेखील हा बॅकअप अनलॉक करू शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. iOS आणि Android युजर्ससाठी फीचर रोलआउट केलं जाईल.