नवी दिल्ली, 20 मे : तुम्ही स्मार्टफोनमध्ये पॉर्न पाहत असाल, तर सावधान, कारण स्मार्टफोनमध्ये पॉर्न पाहणं धोकादायक ठरू शकतं. एका अध्ययनानुसार, जगभरातील अधिकतर लोक आजकाल आपल्या स्मार्टफोनवरच पॉर्न किंवा संबंधी गोष्टी पाहणं पसंत करतात, असं उघड झालं आहे. ब्लॅकमेलिंगचा धोका - स्मार्टफोनवर पॉर्न पाहण्याने ब्लॅकमेलिंगचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक लोक या पॉर्न वेबसाईट्सवर काही असे व्हायरस टाकतात, ज्यामुळे मोबाईलचा डेटा हॅक होऊ शकतो. तसंच काही व्हायरस असेही असतात, जे मोबाईल लॉक करतात आणि मग फोन अनलॉक करण्यासाठी पैशांची मागणी करतात, ब्लॅकमेल करतात. हे सर्व प्रकार फ्रॉड वेबसाईटद्वारे केलं जातं. पॉर्न अॅप डाउनलोड करणं धोकादायक - अनेक लोक यासंबंधीचे अॅपही डाउनलोड करतात. अनेक वेबसाईटवर याप्रकारचे अॅप डाउनलोड करण्यासाठी ऑफर मिळते आणि अनेकांकडून या ऑफरद्वारे अॅप डाउनलोड केलं जातं. काही पॉर्न साईट्स अशा असतात, ज्या सुरू केल्यानंतर आपोआप काही अॅप डाउनलोड करतात. या अॅप्समध्ये धोकादायक व्हायरस असतात. त्यामुळे मोबाईल डेटा लीक होण्याची भीती असते. यापासून वाचण्यासाठी ऑटोमेटिक अॅप डाउनलोड फीचर बंद ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा मोबाईल डेटा चोरी होण्याचा धोका असतो. सायबर क्राईम - सध्या सायबर क्राईमचा धोका वाढला आहे. स्मार्टफोन आणि पीसीवर पॉर्न पाहणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्मार्टफोनचा संपूर्ण डेटा एकमेकांशी जोडलेला असतो. परंतु पीसीवर वेगवेगळ्या विंडो ओपन करता येतात, जो पूर्णपणे एकमेकांशी जोडलेला नसतो. त्यामुळे हेच कारण आहे, मोबाईलचा डेटा चोरी होण्यास वेळ लागत नाही.
व्हॅल्यू अॅडेड सर्विसेजचा (VAS) धोका - स्मार्टफोनवर पॉर्न पाहणं महागात पडू शकतं. कारण काही पॉर्न साईट्स बेकायदेशीररित्या व्हॅल्यू अॅडेड सर्विसेज जोडतात. काही लोक अधिक पैसा कमावण्यासाठी या साईट्सवर अशाप्रकारे सर्विसेज जोडतात. या पॉर्न साईट्स, मोबाईलमध्ये स्वत:चं व्हॅल्यू अॅडेड सर्विसेज अॅक्टिवेट करतात, ज्यामुळे मोबाईल बॅलेन्समधून पैसे कट होतात.
महत्त्वाचे आयडी-पासवर्ड - काही हॅकर्स अशा साईट्सवर काही व्हायरस टाकतात, ज्यामुळे आयडी-पासवर्ड चोरी होण्याचा धोका निर्माण होतो. अनेक जण डिजीटलरित्या आपलं बँक अकाउंट मॅनेज करतात. त्यामुळे फोनमध्ये अनेक पासवर्ड सेव्ह असतात, त्यामुळे पासवर्ड चोरी होण्याचा धोका वाढतो. व्हायरसमुळे हॅकर्सला आपल्या फोनचा अॅक्सेस मिळून डेटा धोक्यात येतो.