नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : Vivo X70 सीरिज भारतात लाँच करण्यात आली आहे. भारतात या सीरिजचे X70 Pro Plus आणि X70 Pro हे दोन फोन लाँच करण्यात आले आहेत. Vivo X70 सीरिजची विक्री भारतात 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. परंतु ग्राहक प्री-बुकिंग आज 30 सप्टेंबरपासून करू शकतील. या दोन्ही फोन्सला Zeiss T* लेन्स कोटिंगसह कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. Vivo X70 Pro च्या 8GB आणि 128GB वेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. 8GB+256GB वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आणि 12GB+256GB वेरिएंटची किंमत 52,990 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. X70 Pro Plus मॉडेलच्या 12GB+256GB वेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे. याची विक्री 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. Vivo X70 Pro Specifications - - 6.56 इंची फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. - MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर - 4,450mAh बॅटरी - 44W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट - Android 11 बेस्ड FunTouch Os कॅमेरा - फोटोग्राफीसाठी Vivo X70 Pro फोनला रियल 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याशिवाय दोन 12 मेगापिक्सल कॅमेरा आणि एक 8 मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स देण्यात आली आहे. प्रायमरी कॅमेराला गिंबल स्टेबिलायजेशन देण्यात आलं आहे. सर्व कॅमेरात Zeiss T* कोटिंग आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
Vivo X70 Pro Plus Specifications - - 6.78 इंची UHD+ AMOLED डिस्प्ले - स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर - 4500mAh बॅटरी - 55W फास्ट चार्जिंग सपोर्ट - Android 11 बेस्ड FunTouch Os
कॅमेरा - X70 Pro Plus ला 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा गिंबल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. शिवाय 48 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 12 मेगापिक्सल पोर्टेट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा पेरिस्कोप कॅमेरा 5x ऑप्टिकल झूम ऑफर करतो. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे.