JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक; पोलिसांकडून Alert जारी

Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक; पोलिसांकडून Alert जारी

अनेक जण ऑक्सिमीटरच्या ऐवजी आपल्या स्मार्टफोनमध्येच ऑक्सिमीटर अ‍ॅप डाउनलोड करुन, त्यात ऑक्सिजन लेवल तपासतात. याचाच फायदा सायबर क्रिमिनल्सकडून घेतला जात असून, अनेकांची फसवणूक केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मे : देशभरात कोरोनामुळे ऑक्सिमीटर डिव्हाईसची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शरीरातील ऑक्सिजन लेवल (Oxygen Level) तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा (Oximeter) वापर केला जातो. अनेक जण ऑक्सिमीटरच्या ऐवजी आपल्या स्मार्टफोनमध्येच ऑक्सिमीटर अ‍ॅप डाउनलोड करुन, त्यात ऑक्सिजन लेवल तपासतात. याचाच फायदा सायबर क्रिमिनल्सकडून घेतला जात असून, अनेकांची फसवणूक केली जात आहे. अनेक जण स्मार्टफोनवर ऑक्सिमीटर अ‍ॅप्स तर डाउनलोड करतात, पण त्यात योग्य रिडिंग न मिळाल्याने नंतर मोठ्या समस्या येतात. बनावट ऑक्सिमीटर अ‍ॅप्सबाबत गुजरात पोलिसांनी इशारा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंटरनेटवर स्मार्टफोनसाठीचे अनेक बनावट ऑक्सिमीटर अ‍ॅप्स सर्कुलेट होत आहे, ज्याचा वापर करुन युजर्सची मोठी फसवणूत होत आहे. गुजरात पोलिसांशिवाय हरियाणा सायबर क्राईम आणि DGP कर्नाटक पोलिसांनीही बनावट ऑक्सिमीटर अ‍ॅपपासून दूर राहण्यासाठी आणि या अ‍ॅप्सद्वारा करण्यात येत असलेल्या दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचं सांगितलं आहे.

(वाचा -  Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा )

कशी होतो फसवणूक - इंटरनेट आणि प्ले स्टोरवर Fake Oximeter App च्या अनेक लिंक्स आहेत. या अ‍ॅप्समध्ये असा दावा केला जातो, की शरीरात फोन लाईट, कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनद्वारे ऑक्सिजन लेवल तपासली जाऊ शकते. ऑक्सिजन लेवल सांगण्याच्या खोट्या दाव्याने, हे अ‍ॅप्स फोनमधील बँक डिटेल्स, कॉन्टॅक्ट्स, फोटो आणि इतर फाईल्सचाही अ‍ॅक्सेस मागतात. या बनावट अ‍ॅपशी जोडलेले हॅकर्स युजर्सच्या फिंगरप्रिंट डेटाद्वारे फोन हॅक करू शकतात आणि बँक अकाउंट खाली होऊ शकतं.

(वाचा -  Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस )

हे बनावट अ‍ॅप्स केवळ चुकीचं रिडिंग देत नाही, तर मोबाईलमधील डेटाही चोरी करतात. सध्या सायबर क्रिमिनल्ससाठी हे बनावट ऑक्सिमीटर अ‍ॅप्स मोठं हत्यार ठरलं आहे. जर तुम्हीही असं कोणतं Oximeter App डाउनलोड केलं असेल, तर ते लगेच डिलीट करा.

(वाचा -  तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत )

कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करताना, या गोष्टी लक्षात ठेवा - केवळ ऑक्सिमीटरचं नाही, तर कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करताना सावध राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्ले स्टोरवरुन कोणतंही हेल्थ अ‍ॅप किंवा इतर अ‍ॅप डाउनलोड करत असाल, तर आधी योग्य माहिती करुन घ्या, कोणती अ‍ॅप्स परमिशन्स मागतात तेदेखील पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी अ‍ॅप डिटेल्समध्ये जाऊन Permission सेक्शनमध्ये चेक करू शकता, की अ‍ॅप कोणत्या परमिशन्स मागतंय, त्यानुसारचं अ‍ॅप डाउनलोड करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या