नवी दिल्ली, 16 जानेवारी : कोरोना काळात शेअर मार्केटच्या मिनिटां-मिनिटाच्या बदलत्या ट्रेंडनंतरही गुंतवणुकदारांची तितकीशी निराशा झालेली नाही. त्याउलट विचार करुन, समजून केलेल्या गुंतवणुकीने गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे. बँकेचे कमी होणारे व्याज दर आणि मार्केटमधील जबरदस्त रिटर्न्स पाहता अनेकांचा कल स्टॉक मार्केटकडे वळताना दिसतो आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणुकदारांनी मार्केटचा संपूर्ण अभ्यास आणि धैर्याने काम करणं गरजेचं असल्याचं मार्केट एक्सपर्ट सांगतात. परंतु प्रत्येकाकडे शेअर मार्केटची समज असतेच असं नाही. अनेकजण एकमेकांना पाहून कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे लावतात आणि नंतर पश्चताप करण्याची वेळ येते. पश्चतापाची वेळ येऊ नये, यासाठी शेअर मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. हा अभ्यास तुम्ही घरबसल्याही करू शकता. अशात स्टॉकडॅडी (StockDaddy) App फायद्याचं ठरू शकतं.
काय आहे StockDaddy App? StockDaddy हे स्टॉक ट्रेडिंग लर्निंग App आहे, जे नव्या गुंतवणुकदारांना शेअर बाजाराचं मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण समजून घेण्यास मदत करतं. StockDaddy App लोकांना पारंपरिक व्यवसायांव्यतिरिक्त इतर व्यवसायांमधून पैसे कमावण्यास आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत मूल्य जोडण्यात सक्षम करतं. EaseMyTrade द्वारे समर्थित अत्याधुनिक स्मार्ट सुविधांयुक्त असलेलं StockDaddy App हा एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जो नव्या गुंतवणुकदारांना बाजारातील बारकाव्यांसह, स्टॉक मार्केटचं ज्ञान वाढवण्यास, मार्केट कौशल्य सुधारण्यास मदत करतं.
StockDaddy App EaseMyTrade चे संस्थापक आलोक कुमार यांनी तयार केलं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक आणि व्यवसायाबाबत लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी हे App सुरू केलं. StockDaddy App वर दोन प्रकार आहे. एक स्टॉक मार्केट फॉर बिगिनर्स आणि दुसरं स्टॉक मार्केट मास्टरी. या App वर लोकांना ऑनलाइन क्लासची सुविधा दिली जाते, ज्यांना यात अधिक माहिती, ज्ञान मिळवायचं आहे. आता या App वर ऑफलाइन कोर्सची सुविधादेखील लवकरच सुरू केली जाणार आहे.