नवी दिल्ली, 27 मार्च : जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात गाड्या ऑटोमोबाईल कंपन्यांपर्यंतच सिमित राहिल्या नसून आता टेक कंपन्याही या फिल्डमध्ये उतरत आहेत. अॅपल येणाऱ्या काही वर्षात इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रसिद्ध असलेली चिनी कंपनी शाओमीदेखील आता इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या तयारीत आहे. शाओमी बॅटरी पॉवर्ड ऑटोमोबाईल्सवर पूर्णपणे फोकस करण्याचा प्लॅन करत आहे. अशात ग्लोबल ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये हे एक मोठं पाऊल ठरु शकतं.
शाओमी जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी असल्याचं म्हटलं जातं. 2020 मध्ये अॅपलला मागे टाकत शाओमी जगातील तिसरी सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी ठरली होती. या कंपनीने केवळ स्मार्टफोनच नाही, तर टीव्ही सेट, होम अप्लाएंस, स्मार्टवॉच आणि इतर प्रोडक्ट्सवरही फोकस केला आहे.
शाओमीने ऑटोमोटिव्ह वर्ल्डमध्येही एन्ट्री केली आहे. कंपनीने यापूर्वी लॅम्बोर्गिनीसह भागीदारी करत गोकार्ट बनवलं होतं, ज्याचं नाव Ninebot गोकार्ट प्रो असं होतं.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, शाओमी कॉर्प आता इलेक्ट्रिक व्हिकल्स बनवणार आहे. कंपनी येथे ग्रेट वॉल मोटर्स कंपनी लिमिटेड फॅक्ट्रीचा वापर करेल. शाओमीच्या इलेक्ट्रिक व्हिकल्सबाबत आलेल्या रिपोर्टनंतर, काही वेळातच शाओमी आणि ग्रेट वॉल मोटर्सचे शेअर लगेचच वाढले. परंतु याबाबत शाओमीने अद्यापी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.