स्वस्तात मिळेल स्मार्ट टीव्ही
Xiaomi Sale: शाओमी आपल्या ग्राहकांसाठी रेंजचे प्रोडक्ट लॉन्च करते. विशेषतः ज्या लोकांचं बजेट कमी आहे त्या ग्राहकांसाठी अनेक परवडतील असे ऑप्शन उपलब्ध आहेत. स्मार्टफोनचे रेडमी मॉडल भारतात खूप प्रसिद्ध आहेत. पण स्मार्ट टीव्हीविषयी बोलायचं झालं तर रेडमीचे स्मार्ट टीव्ही देखील 10 हजारांपेक्षा कमी पैशांत मिळतील. Xiaomi च्या 9व्या वाढदिवसानिमित्त ग्राहकांना एक मोठी भेट मिळाली आहे. कंपनी आपले मोबाईल, टीव्ही, एसेसरीज खूप स्वस्तात उपलब्ध करत आहे. दिलेल्या माहितीनुसार सेलमध्ये स्मार्ट टीव्ही 60% पर्यंतच्या सूटवर खरेदी केले जाऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफरविषयी… Smartphone: पावसात फोन भिजला तर ड्रायरने वाळवावा का? एकदा अवश्य घ्या जाणून Redmi Smart Fire TV: ग्राहक हा 32-इंचाचा टीव्ही सेलमध्ये 24,999 रुपयांऐवजी केवळ 9,749 रुपयांना खरेदी करू शकतात. चेकआउटच्या वेळी यावर 500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जाईल. Xiaomi Smart TV 5A: Xiaomi चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही ग्राहक 24,999 रुपयांऐवजी केवळ 11,249 रुपयांना खरेदी करू शकतात. विशेष बाब म्हणजे या टीव्हीसोबत ग्राहकांना 1,999 रुपयांचा स्मार्ट स्पीकर मोफत दिला जात आहे. Xiaomi Smart TV X43 : हा स्मार्ट टीव्ही मिड-रेंज मध्ये येतो. सेलमध्ये हा टीव्ही 42,999 रुपयांऐवजी केवळ 25,499 रुपयांमध्ये मिळेल. या टीव्हीवर ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळू शकतो. Tech News: प्रायव्हेट WhatsApp चॅट Gmail वरही करता येते सेव्ह, ही आहे ट्रिक! Xiaomi Smart TV 5A 43: हा टीव्ही 35,999 रुपयांऐवजी, ग्राहक केवळ 20,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यावरही ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन मिळू शकतो. Redmi Smart TV X43 : हा टीव्ही 42,999 रुपयांऐवजी फक्त 22,499 रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीसोबत स्मार्ट स्पीकर फ्रीमध्ये मिळतील. ज्याची किंमत 1,999 रुपये आहे. Xiaomi Smart TV X50: हा टीव्ही ग्राहक 44,999 रुपयांऐवजी 30,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा टीव्ही ग्राहक नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकतात.