तुम्ही पावसात अडकलात आणि तुमच्या खिशात ठेवलेला फोन ओला झाला तर तो सुकवण्यासाठी कधीही हेअर ड्रायर वापरू नका. कारण, यामुळे डिव्हाइसचे नाजूक इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स खराब होऊ शकतात.
फोन सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. तसेच, यावेळी चार्जर प्लग इन करू नये. कारण, यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. मग फोन ओला झाल्यावर नेमकं काय करावं?
फोन ओला झाला तर आधी तो बंद करा. कारण, ओला स्मार्टफोन वापरल्याने नुकसान होण्याचा धोका आणखी वाढू शकतो. तसेच स्वच्छ कापड घेऊन ते चांगले पुसून टिश्यू पेपरने गुंडाळा.
ओल्या फोनला हेडफोन किंवा इतर कोणतीही केबल जोडलेली असेल तर लगेच काढून टाका. त्याचप्रमाणे, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड देखील काढून टाका. यानंतर, फोनला प्रत्येक अँगलने शेक करा. जेणेकरून पाणी बाहेर येऊ शकेल.
शक्य असल्यास, भिजलेला फोन मॉइस्चर एब्जॉर्बिंग पॅकेटसोबत एका एयरटाइट बॉक्समध्ये ठेवा. हे देखील झाले नाही तर तांदळामध्ये 24 तासांसाठी मोबाईल ठेवा. कारण तांदूळ ओलावा शोषून घेतात. पण चांदळाची डस्ट फोनमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या.