JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना? असा होतोय तरुणींच्या FB फोटोचा गैरवापर

तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना? असा होतोय तरुणींच्या FB फोटोचा गैरवापर

प्रतिष्ठितांचे फेक आयडी बनवून त्यावर तरुणींचे फोटो अपलोड करण्याचा स्कॅम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

Facebook Representative Image

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 27 जून: कोरोना काळात एकीकडे डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली असताना, दुसरीकडे मात्र सायबर क्राईमचं प्रमाणंही वाढलं आहे. फसवणूक करणारे विविध मार्गांची लोकांनी आर्थिक फसवणूक करत आहेत. आता सायबर क्रिमिनल्सनी आणखी एक नाव मार्ग शोधला असून याद्वारे लोकांनी फसवणूक केली जात असून मोठी रक्कम उकळली जात आहे. नागपुरात हायप्रोफाईल नावाचा वापर करत लोकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एस्कॉर्ट सर्विसच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सायबर क्रिमिनल्सनी शहरातील बड्या लोकांचे, प्रतिष्ठितांचे फेसबुक आयडी हॅक करण्याचा प्रकार सुरू केला आहे. प्रतिष्ठितांचे फेक आयडी बनवून त्यावर तरुणींचे फोटो अपलोड करण्याचा स्कॅम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे सेक्सटॉर्शन अशा प्रकाराद्वारे ऑनलाईन सेक्सच्या नावाखाली व्हिडीओ करुन, नंतर ते संबंधित व्यक्तीला पाठवले जातात आणि ब्लॅकमेल करुन बदनामी करण्याच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे. फेक फेसबुक आयडीचा वापर करुन फसवणूक झाल्याची तीन प्रकरणं नागपुरात समोर आली आहेत.

(वाचा -  कोणालाही कळणार नाही काय सर्च केलं; Google Search History साठी असा ठेवा पासवर्ड )

बदनामी होईल यामुळे अनेक जण तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मात्र अनेकांना यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाने फेक फेसबुक आयडी ओपन केलं जातं.

(वाचा -  Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालंय? असं करा डिलीट )

त्यानंतर त्यावर तरुणींचे फोटो आणि फोन नंबर अपलोड केले जातात. आणि एखाद्याने त्यावर कॉल केल्यास त्याला जाळ्यात ओढून पुढे ब्लॅकमेल करत पैसे उकळले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या