नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी (Realme) त्यांचा बहुचर्चित realme 8 pro फोन 2 मार्च रोजी लाँच करणार आहे. या फोनचं खास वैशिष्ट्यं म्हणजे यात 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या सीरीजबाबत सध्या कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. रियलमीचा 108 मेगापिक्सल कॅमेरा इव्हेंट कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्ट्रिम केला जाईल. तसंच यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवरही हे स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. रियलमीचे CEO माधव सेठ यांनी रियलमी 8 सीरीजमध्ये येणारा फोन एक्सेप्शनल परफॉर्मेंससह असणार असल्याचं सांगितलं आहे. ट्विटरवर त्यांनी येणाऱ्या 108 मेगापिक्सल कॅमेरा टेक्नोलॉजीची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या फोनला ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 720 प्रोसेसर असेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि अँड्रॉईड 10 सॉफ्टवेअर असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रियलमी 8 सीरीज फोन, शाओमी रेडमी नोट 10 सीरीज लाँचिंगच्या दोन दिवस आधी लाँच केला जाणार आहे. रेडमी नोट 10 सीरीजचं लाँचिंग भारतात 4 मार्च रोजी होणार आहे. या फोनमध्येही 108 मेगापिक्सल कॅमेरा असल्याची माहिती आहे. तर रियलमी 8 प्रो सीरीज 2 मार्च रोजी लाँच करणार असून यातही 108 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे.