JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / या अमेरिकन कंपनीने खरोखर बनवली आहे हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचा हातभार

या अमेरिकन कंपनीने खरोखर बनवली आहे हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचा हातभार

LuftCar कंपनी ही अमेरिकेत उडणारी कार तयार करत आहे. कारचा वेग हा 350KMPH प्रतितास असणार आहे. त्याचबरोबर ही कार जमिनीवरही चालेल आणि जमिनीपासून चार हजार फुटांच्या उंचीवरही उडणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : मागच्या काही काळापासून माध्यमांमध्ये फ्लाइंग कारच्या लॉन्चिंग विषयी फार चर्चा होत आहे. अनेकांना ही योजना केवळ स्वप्नं वाटतं. परंतु आता खरंच हे स्वप्नं सत्यात उतरणार आहे. 2023 पर्यंत उडणाऱ्या कार्स बाजारात (flying cars in the future) येण्याची शक्यता आहे. त्यामुळं ट्रॅफिक जॅम पासून लोकांची सुटका होणार आहे. कारण आता अनेक कंपन्या अशा प्रकारच्या कारगाड्या तयार करण्यावर (flying car concept) काम करत आहे. LuftCar कंपनी ही अमेरिकेत उडणारी कार तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू केलं आहे. त्यामुळं आता या कार्समध्ये काय नेमकी खासियत असेल हे जाणून घेऊयात.

माणूसकीचा पडला विसर! Uber ने असं काही केलं की कोर्टानेही व्यक्त केली नाराजी

काय असतील फीचर्स? LuftCar कंपनी उडणाऱ्या या कारमध्ये सहा प्रोपेलर देणार आहे. त्या कारचा वेग हा 350KMPH प्रतितास असणार आहे. त्याचबरोबर ही कार जमिनीवरही चालेल आणि जमिनीपासून चार हजार फुटांच्या उंचीवरही उडणार आहे.

केवळ 15 मिनिटांत चार्ज होणारा Redmi चा Smartphone; फीचर्स आणि किंमत पाहा

काय असेल किंमत? LuftCar ची फ्लाइंग कार ही हाइड्रोजन इंधनावर चालणार असून त्यात पाच लोकांच्या बसण्याची व्यवस्था असेल. त्याची किंमत ही 26 लाखांच्या आसपास असणार आहे. त्यामुळं या कारला फक्त श्रीमंत लोकांनाच खरेदी करता येईल असं बोललं जात आहे. LuftCar कंपनीचे सीईओ संत सत्य यांनी याविषयी बोलताना सांगितलं की गर्दी असलेल्या शहरांमध्ये या कारचा वापर करणं फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर या कारच्या माध्यमातून लांब पल्याचा प्रवास करता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

PUBG च्या ‘या’ गेमची भारतात वाढतेय क्रेझ; 3 दिवसांत 1 कोटी लोकांनी केला डाउनलोड

सीईओ संत सत्य याचं असं आहे भारत कनेक्शन… LuftCar कंपनीचे सीईओ संत सत्य यांनी चेन्नईतील अन्ना विद्यापीठातून (Anna University) शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यामुळं आता हवेत उडणारी कार बनवण्यात एका भारतीय व्यक्तीचं योगदान असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या