• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • माणूसकीचा पडला विसर! Uber ने असं काही केलं की कोर्टानेही व्यक्त केली नाराजी

माणूसकीचा पडला विसर! Uber ने असं काही केलं की कोर्टानेही व्यक्त केली नाराजी

अमेरिकेच्या न्याय विभागाने दिव्यांग प्रवाशांकडून जास्त पैसे आकारल्याबद्दल जगप्रसिद्ध उबरवर खटला दाखल केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : जगभरात वाहतुकीसाठी Uber टॅक्सीचा वापर होतो. सध्या उबर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने दिव्यांग प्रवाशांकडून जास्त पैसे आकारल्याबद्दल जगप्रसिद्ध उबरवर खटला दाखल केला आहे. भेदभावविरोधी कायद्यांतर्गत या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेशही या विभागाने फेडरल कोर्टाला दिले आहेत. उबरविरोधात असा दावा करण्यात आला, की उबरचा What Time चार्ज अपंगांसाठी भेदभाव करणारा आहे. कारण त्यांना कारमध्ये चढण्यासाठी 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारे अधिकचा चार्ज आकारणं चुकीचं आहे. अशा व्यक्तीकडून अधिक चार्ज आकारल्याबाबत सॅन फ्रँसिस्कोतील डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये दाखल करण्यात आला आहे. न्याय विभागातील सिव्हिल राइड विभागाचे सहाय्यक ऍटर्नी जनरस ख्रिश्चन क्लार्क यांनी सांगितलं, की सामाजिक व्यवस्थेतील अपंग लोकांना सर्व क्षेत्रात समान अधिकार आहेत, ज्यात Uber सारख्या खाजगी वाहतूक कंपन्यांचा समावेश आहे. अपंग व्यक्तीकडून अशाप्रकारे वेटिंग शुल्क आकारणं ही बाब अतिशय निराशाजनक असल्याचंही सांगण्यात आलं. याच्या उत्तरात उबरने सांगितलं, की त्यांनी कोणत्याही पॉलिसीचं उल्लंघन केलेले नाही.

  आता Two Wheelers मध्ये मिळणार Airbag चं फीचर, अपघातावेळी सेकंदात होईल सुरक्षा

  उबर प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितलं, की वेटिंग शुल्क त्या प्रवाशांसाठी नाही जे आधीच उबर असल्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु वेटिंग शुल्क अशा प्रवाशांसाठी आहे जे कॅब पोहोचल्यानंतरही येण्यास उशीर करतात. अपंग प्रवाशांनी माहिती दिल्यावर उबर वेटिंग शुल्क परत करते. तसंच नवीन बदलांनंतर अपंगांसाठी वेटिंग शुल्क स्वयंचलितपणे माफ करण्यासाठी एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती उबर प्रवक्त्यांनी दिली आहे.
  Published by:Karishma
  First published: