नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी Nokia ने आपला सर्वात दमदार स्मार्टफोन Nokia XR20 भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. या फोनच्या प्री-बुकिंग तारखेचाही कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे. हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येणारा कंपनीचा लेटेस्ट फोन आहे. हा फोन सध्या यूएस, युके, युरोपसारख्या बाजारात विक्री होत आहे.
Nokia XR20 किंमत - Nokia XR20 च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत USD 550 म्हणजे जवळपास 40,900 रुपये आहे. हा फोन ग्रेनाइट आणि अल्ट्रा ब्लू कलर ऑप्शनमध्ये आहे. फोन 4GB + 64GB वर्जनमध्येही उपलब्ध आहे. भारतात या फोनची किंमत अंदाजे 45,000 रुपयांपर्यंत असू शकते. भारतात Nokia XR20 चं प्री-बुकिंग 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Nokia XR20 स्पेसिफिकेशन्स - Nokia XR20 फोन 6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आणि 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह असेल. फोन Android 11 OS आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. कंपनीने 3 वर्षांचं OS अपग्रेड आणि 4 वर्षांपर्यंत मासिक सुरक्षा अपडेटचा दावा केला आहे. हा फोन डस्टप्रूफ आणि वॉटर-रेसिस्टेंस आहे. - 6.67-इंची FHD+ डिस्प्ले - 1080 × 2400 पिक्सल रेजोल्यूशन - सेंटर-पोजीशन पंच-होल कॅमेरा आणि 550 निट्स पीक ब्राइटनेस - Gorilla Glass Victus protection - क्वाॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट - गेमसाठी एड्रेनो 619 GPU - बॅटरी 4,630mAh
कॅमेरा - Nokia XR20 फोनला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ZEISS ऑप्टिक्ससह 48MP प्रायमरी सेंसर आणि f/1.8 अपर्चर आणि 13MP वाइड-अँगल लेन्स आहे. फोनला सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.