नवी दिल्ली, 24 जून : सोशल मीडियावर (Social Media) आता लोकांच्या फेक-बनावट अकाउंटवर (Fake Accounts) लगाम लागेल. सरकारने याचदृष्टीने पावलं उचलली आहेत. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी, कोणत्याही खात्यात फेक फोटो असल्याची तक्रार कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीकडून येत असेल, तर कंपनीला तो फोटो 24 तासांच्या आत हटवावा लागेल, हे अनिवार्य करण्यात आलं आहे. हे नियम नव्या आयटी नियमांत आणले गेले आहेत. आता सोशल मीडिया कंपन्यांना तक्रारीनंतर त्वरित त्यावर कारवाई करावी लागेल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एका उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता, खेळाडू, राजकारणी किंवा कोणत्याही सामान्य व्यक्तीने आपला फोटो दुसऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याबद्दल तक्रार करुन आक्षेप नोंदवला, तर कंपनीला ते अकाउंट बंद करावं लागेल. नव्या आयटी नियमात ही तरतूद करण्यात आली आहे, की कंपनीला त्याच दिवशी यावर तोडगा काढावा लागेल.
आतापर्यंत असं पाहण्यात आलं आहे, की काही लोक मोठ्या व्यक्ती किंवा इतर लोकांचा प्रोफाईल फोटो लावून फेक अकाउंट तयार करतात. फॉलोवर्स वाढवणं, संबंधित व्यक्तीवर निशाणा साधणं किंवा बेकायदेशीर कृत्य करणं हा त्यामागचा उद्देश, हेतू असू शकतो.
तसंच, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय पुढील एक किंवा दोन आठवड्यात FAQ आणि त्याबाबतची उत्तर जारी करेल. हे प्रश्न नवीन नियमाशी संबंधित असतील. या निमयामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांचा कसा फायदा होईल आणि इतर संभाव्य उपायांचा समावेश असेल.