नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : अनेकदा व्हॉट्सअॅपवर (WhatsApp chatting) स्टेटस टाकताना चुकून आपल्याकडून काही वेगळंच शेयर जातं. अशावेळी आपण आपलं स्टेटस डिलीट करेपर्यंत काही लोकांनी ते पाहिलेलं असतं. त्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होते. अशी समस्या येऊ नये यासाठी WhatsApp नवं (New feature in WhatsApp ) फीचर आणणार आहे. या नव्या फीचरमुळे एकदा पोस्ट केलेलं WhatsApp Status काही सेकंदाच्या आत डिलीट (Deleting WhatsApp Status) करता येणार आहे. WhatsApp सध्या Undo आणि Redo बटनवर काम करत असून त्याचं अपडेट काही दिवसांत येणार असल्यानने याचा फायदा WhatsApp Users ला घेता येईल. अनेक जण खास समारंभाचे किंवा आपल्या महत्त्वाच्या क्षणांचे काही फोटो किंवा व्हिडीओ आपल्या WhatsApp स्टेटसवर शेयर करतात. परंतु कधीतरी दुसराच चुकीचे फोटो आपल्याकडून शेयर होतो. अशावेळी WhatsApp चं हे नवं फीचर फायदेशीर ठरेल.
WhatsApp वर शेयर केलेले स्टेटस 24 तासांसाठी राहतात. परंतु आता WhatsApp कडून WhatsApp स्टेटसला काही सेकंदात Undo करण्याच्या अपडेटवर काम केलं जात आहे. त्यामुळे हे अपडेट आल्यानंतर आपल्याला चुकून टाकलं गेलेलं स्टेटस तात्काळ डिलीट करता येईल. हा ऑप्शन WhatsApp Status च्या बाजूलाच असणार आहे.
याबाबत WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. त्यात आपलं स्टेटस हटवण्यासाठीचं Undo बटनही दिसतं आहे. सध्या हे अपडेट WhatsApp Android बीटा व्हर्जन 2.21.22.6 मध्ये उपलब्ध आहे. WhatsApp कडून सतत आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट आणलं जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी WhatsApp Payment हे फीचरही दिलं. त्यामुळे यूजर्सला WhatsApp वरून थेट पेमेंट करणं शक्य झालं आहे.