JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Netflix युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता स्वस्तात घ्या Subscription, तपासा नवे रेट्स

Netflix युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता स्वस्तात घ्या Subscription, तपासा नवे रेट्स

भारतात नव्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नेटफ्लिक्सने भारतात आपल्या सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किमतीत घट केली आहे. भारतात मासिक प्लॅन 149 रुपयांपासून सुरू होतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जानेवारी : तुम्हीही नेटफ्लिक्स वापरत असाल,तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन प्लॅन काही देशांमध्ये महाग झाले आहेत. तर कंपनीने नुकतंच भारतात आपल्या मासिक आणि वार्षिक प्लॅनच्या किमतीत कपात केली आहे. तर कंपनीने यूएस आणि कॅनडामध्ये दर वाढवले आहेत. भारतात नव्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नेटफ्लिक्सने भारतात आपल्या सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किमतीत घट केली आहे. भारतात मासिक प्लॅन 149 रुपयांपासून सुरू होतो. नेटफ्लिक्स प्रवक्त्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीत सांगितलं, की आम्ही आमच्या किमती अपडेट करत आहोत. जेणेकरुन आम्ही विविध प्रकारचा कंटेंट, मनोरंजनाचे विविध पर्याय देत राहू. आम्ही अनेक ऑफर जारी करतो, जेणेकरुन युजर त्यांच्या बजेटनुसार, योग्य किंमत निवडू शकतील. भारतात नेटफ्लिक्स मोबाइल प्लॅनची किंमत 199 रुपयांवरुन 149 रुपये करण्यात आली आहे. मोबाइल प्लॅन युजर्सला 480p वर फोन आणि टॅबलेटवर व्हिडीओ स्ट्रिमिंगची सुविधा मिळते.

हे वाचा -  सरकारकडून Sim Card नियमांत बदल, TRAI च्या शिफारशींनंतर मोठा निर्णय; पाहा डिटेल्स

बेसिक प्लॅन युजरला एका वेळी एक मोबाइल, टॅब, कंप्यूटर आणि टीव्हीवर व्हिडीओ स्ट्रिम करण्याची परवानगी देतो. सध्या याची किंमत 199 रुपये आहे. यापूर्वी हा प्लॅन 499 रुपयांचा होता.

हे वाचा -  Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

स्टँडर्ड सब्सक्रिप्शन प्लॅन युजरला HD व्हिडीओ स्ट्रिमिंगची सुविधा देतं. आता भारतात याची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या डिव्हाइसवर व्हिडीओ स्ट्रिम करण्याची सुविधा मिळते. याआधी स्टँडर्ड प्लॅनची किंमत 649 रुपये होती.

हे वाचा -  Alert!बँकेतही सुरक्षित नाही तुमचा पैसा;सर्व्हेतून धक्कादायक खुलासा,काय आहे कारण

प्रीमियम प्लॅनची किंमत आधी 799 रुपये होती, आता प्लॅनची किंमत कमी करुन 649 करण्यात आली आहे. प्रीमियम प्लॅन युजरला 4K+HDR मध्ये व्हिडीओ ब्राउज करण्याची सुविधा देतो. प्रीमियम प्लॅनमध्ये युजर्स एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर स्ट्रिमिंग करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या