JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Mi Anniversary Sale: ग्राहकांनो! स्वस्त स्मार्टफोनसह फ्रीमध्ये मिळतोय Wifi Smart Speaker

Mi Anniversary Sale: ग्राहकांनो! स्वस्त स्मार्टफोनसह फ्रीमध्ये मिळतोय Wifi Smart Speaker

सेलमध्ये ग्राहकांना रेडमी 10 नोटच्या खरेदीवर Mi Wifi स्मार्ट स्पीकर मोफत मिळणार आहे. या स्मार्ट स्पीकरची किंमत 1999 रुपये आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जुलै : स्मार्टफोन निर्माता कंपनी MI ने ग्राहकांसाठी ऑफर जारी केली आहे. Mi Anniversary Sale 2021 अंतर्गत अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. आज 14 जुलै सेलचा तिसरा दिवस आहे. ग्राहक या सेलमध्ये फोनसह फ्री सामानही मिळवू शकतात. सेलमध्ये रेडमी नोट 10 खरेदी केल्यास, ग्राहकांना फ्री प्रोडक्टची ऑफर आहे. Mi.Com ने दिलेल्या माहितीनुसार, सेलमध्ये ग्राहकांना रेडमी 10 नोटच्या खरेदीवर Mi Wifi स्मार्ट स्पीकर मोफत मिळणार आहे. या स्मार्ट स्पीकरची किंमत 1999 रुपये आहे. Redmi 10 Note फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर याच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. ( 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे बेस्ट स्मार्टफोन्स; खरेदीची सुवर्णसंधी ) Redmi 10 Note स्पेसिफिकेशन्स - - 6.43 इंची फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले - 1080x2400 पिक्सल रिजोलूशन - 6 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 SoC प्रोसेसर - अँड्रॉईड 11 पर बेस्ड MIUI 12 - 5000mAh बॅटरी - 33 W फास्ट चार्जिंग सपॉर्ट ऑफर Mi.com पर मिल रहा है. ( Mi Anniversary Sale: खुपच स्वस्त मिळतोय Xiaomi चा नवा स्मार्टफोन ) कॅमेरा - या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फोनला सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wifi, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इंफ्रारेड, यूएसबी टाईप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या