प्रतिकात्मक फोटो
मुंबई ११ नोव्हेंबर : तुम्हाला बाजारात किंवा रस्त्यावर मारुती सुझुकीच्या गाड्या हमकास दिसतील. ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ग्राहकांच्या रिक्वार्मेंटनुसार बाजारात घेऊन येते. त्यात स्विफ्ट आणि डिझायर मॉडलच्या गाड्यांना अनेकांकडून पसंती दर्शवली जात आहे. लोकांची मागणी आणि कम्फर्ट लक्षात घेता आता कंपनी या गाडीची हायब्रिड आवृत्त्या भारतात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी ही कार कार 2024 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च करणे अपेक्षित आहे. या गाडीचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे ही गाडी 1.2 लिटरच्या पेट्रोलमध्ये सर्वाधिक म्हणजेच 35-40 kmpचा मायलेज देणार आहे. कंपनीचं हे टार्गेट आहे आणि त्याच दिशेने कंपनी काम देखील करणार आहे. तसेच या गाडीच्या इंजिनमध्ये सध्याच्या के-सीरीज 4-सिलेंडर युनिटच्या विरुद्ध 3-सिलेंडर युनिट जोडले जाईल. या मोटरमध्ये टोयोटाची स्ट्राँग हायब्रिड टेक वापरण्यात येणार आहे. हे ही वाचा : एक लाख किलोमीटर अंतर चालल्यानंतर कारच्या सर्व्हिससाठी जास्त खर्च का लागतो? जाणून घ्या कारण 40kmpl पर्यंत मायलेज कोडनम Z12Eअसलेले, मारुती सुझुकीचे एक मजबूत हायब्रिड सिस्टीम असलेले नवीन कार स्विफ्ट आणि डिझायर भारतातील कमीत कमी इंधनात जास्त धावणारी कार बनेल, म्हणजेच सर्वाधीक मायलेज असलेली ही कार असेल. हे दोन्ही मॉडेल्स 35-40 किमी प्रति ARI-प्रमाणित मायलेज देऊ शकतात, जे सध्यातरी देशातील कोणतीही कार देत नाही. त्यामुळे २०२४ मध्ये येणारे दोन्ही नवीन मॉडल मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करेल आणि आगामी CAFÉ II चे अनुसरण करेल. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायरचे फीचर्स » उच्च इंधन अर्थव्यवस्था आणि कमी CO2 उत्सर्जन कार निर्मात्यासाठी CAFE (Corporate Average Fuel Economy) रेटिंग वाढवेल. »मारुती आणि टोयोटा दोघेही या तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावर स्थानिकीकरणासाठी एकत्र काम करत आहेत. जेणेकरून खर्च कमी करता येईल. मारुती ही माइल्ड हाइब्रिड आणि स्ट्ऱाँग हाइब्रिड प्रकारांमधील किंमतीतील फरक 1-1.5 लाखांपर्यंत कमी करण्याचा विचार कर आहे. »पुढील पिढीच्या मारुती स्विफ्ट आणि डिझायरला मजबूत हायब्रीड प्रकारासह नैसर्गिकरीत्या एस्पिरेटेड 1.2-लीटर के-सीरीज पेट्रोल मोटर देखील मिळेल. » मारुती स्विफ्ट आणि डिझायर दोन्ही त्यांच्या सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात, कंपनीने स्विफ्टच्या एकूण 17,231 युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 9,180 युनिट्सच्या तुलनेत 88% अधिक होती. » यासह, ऑक्टोबर महिन्यात अल्टो आणि वॅगनआर नंतर ही देशातील तिसरी सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. त्याच वेळी, डिझायरच्या एकूण 12,321 युनिट्सची विक्री झाली आणि ती सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार राहिली.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन स्विफ्टची किंमत किती असेल? सध्याच्या स्विफ्टची सुरुवातीची किंमत 5.92 लाख रुपये आणि डिझायरची 6.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, नवीन अपडेटमुळे स्ट्राँग हायब्रिड व्हर्जनची किंमत नक्कीच त्यापेक्षा जास्त असेल.