नवी दिल्ली, 2 जून : गेल्या वर्षभरापासून कोरोना (corona) आणि लॉकडाउनमुळे (lockdown) बहुतांश लोक घरात आहेत. घरीच असल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढलाय. लॉकडाउनमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवे रिचार्ज प्लॅन्स (recharge plan) सादर करत आहेत. अनेक कंपन्या कॅशबॅक (cashback), Buy 1 get 1 free सारख्या ऑफर (offers) देत आहेत. काही कंपन्यांनी जुन्या रिचार्जची व्हॅलिडिटी (recharge validity) वाढवून देण्याची घोषणा केली आहे. अशातच भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी (telecom company) असलेल्या बीएसएनएलनेदेखील (BSNL)आपल्या युजर्ससाठी लॉकडाउन स्पेशल ऑफर (lockdown special offer) आणली आहे. लॉकडाउन लक्षात घेऊन कंपनीने लो बजेट सेगमेंट ऑफर सादर केल्या आहेत. या वेळीही त्यांनी अशीच एक ऑफर आणली आहे. या रिचार्जवर ग्राहकांना 180 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे.
बीएसएनएलचे सीएमडी प्रवीण कुमार यांनी सांगितलं, की कंपनी आपल्या युजर्सना कोरोनाच्या आणि लॉकडाउनच्या कठीण काळात मदत करण्यास कटिबद्ध आहे. यासाठी कंपनीने खास 4% कॅशबॅकचा प्लॅन आणला आहे. बीएसएनएल युजर आपले नातेवाईक अथवा मित्रांच्या फोनचं रिचार्ज करत असतील, तर त्यांना बीएसएनएलकडून 4 टक्के कॅशबॅक दिला जाईल. ही ऑफर मिळवण्यासाठी बीएसएनएल युजरला My BSNL App चा वापर करून रिचार्ज करावं लागेल. तसंच ज्या नंबरवरून तुम्ही रिचार्ज करताय तो नंबर My BSNL App वर रजिस्टर्ड नसेल, तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. त्यासाठी प्रवीण कुमार युजर्सना ‘Go Digital’ चा सल्ला देतात.
बीएसएनएलचा एक वर्षाचा प्लॅन - बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजरला 365 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते. तसंच अनलिमिटेड कॉल्स (unlimited calls) आणि दररोज 100 SMS मोफत ही सुविधा दिली जाते. 1499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी 24 GB इंटरनेट डेटा दिला जातो. जे ग्राहक कमी डेटा वापरतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन वर्षभरासाठी खूप स्वस्त आणि फायदेशीर आहे.