JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / या iPhone ची किंमत 18 लाख रुपये, इतकं काय आहे खास; वाचा डिटेल्स

या iPhone ची किंमत 18 लाख रुपये, इतकं काय आहे खास; वाचा डिटेल्स

Caviar ने iPhone 13 pro आणि iPhone 13 pro max चे एकूण 5 मॉडेल लाँच केले आहेत. या फोनची किंमत भारतीय रुपयांत 4 लाख 80 हजारांहून सुरू होऊन 18 लाख रुपयांपर्यंत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : Caviar एक असा ब्रँड आहे, जो लक्झरी स्मार्टफोन्सला कस्टमाइज करतो. आता या ब्रँडने iPhone 13 च्या दोन प्रो मॉडेल्सचे कस्टम मॉडेल लाँच केले आहेत. हे दोन्ही मॉडेल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max आहेत. कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन डिझाइन रोलेक्स वॉचच्या अनेक मॉडेलपासून प्रेरित आहे. Caviar ने iPhone 13 pro आणि iPhone 13 pro max चे एकूण 5 मॉडेल लाँच केले आहेत. या फोनची किंमत भारतीय रुपयांत 4 लाख 80 हजारांहून सुरू होऊन 18 लाख रुपयांपर्यंत आहे. या पाच मॉडेलमध्ये सर्वात महागडा iPhone 13 pro आहे, जो कंपनीने रोलेक्सच्या पॉप्युलर मॉडेल केलिनी कलेक्शनवर बनवला आहे. या स्मार्टवॉचच्या टॉप पार्टमध्ये व्हाईट गोल्डचा वापर करण्यात आला आहे. तर बॉटम पार्टमध्ये मगरीच्या स्किनचा वापर केला आहे. तसंच या स्मार्टवॉचच्या मॉडिफाइड मॉडेलच्या फ्रेममध्येही 18 कॅरेट रोज गोल्डचा वापर केला गेला आहे. या कस्टमाइज iPhone मॉडेलची किंमत भारतीय रुपयात 18 लाख 50 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे कंपनीने iPhone 13 pro सीरिजचं दुसरं कस्टमाइज मॉडेल लाँच केलं आहे, जे रोलेक्सच्या कॉस्मोग्राफ डेटोना कलेक्शनवर आधारित आहे. याच्या टॉप पार्टमध्ये कंपनीने खऱ्या उल्का पिंडचा वापर केला आहे. तर बॉटम पार्टमध्ये कंपनीने कार्बन फायबरसह डायगोनल वेवचा वापर केला आहे. या कस्टमाइज iPhone मॉडेलची किंमत भारतीय रुपयांत 5 लाख 20 हजार रुपये आहे.

iPhone 13 सीरिजसाठी प्री-बुकिंग सुरू, असा मिळेल डिस्काउंट

याच सीरिजच्या आणखी एका iPhone मॉडेलला कंपनीने रोलेक्स स्काय ड्वेलर सीरिजवर बनवलं आहे. यात कंपनीने टॉप पार्टवर हाय इम्पॅक्ट टायटेनियम आणि ब्लॅक PVD कोटिंगचा वापर केला आहे. या मॉडेलच्या फ्रेममध्ये 24 कॅरेट गोल्ड कोटिंगचा वापर केला आहे. या कस्टमाइज iPhone मॉडेलची किंमत भारतीय रुपयांत 5 लाख 10 हजार रुपये आहे.

आयफोन खरेदीची सुवर्णसंधी, iPhone 13 लाँच होताच स्वस्त झाला iPhone 11

आणखी एक iPhone 13 pro मॉडेल कंपनीने ऑलिव्ह रेंजमध्ये कस्टमाइज केलं आहे. यात कंपनीने टॉप पार्टमध्ये अॅल्युमिनियमचा ऑलिव्ह ग्रीन कलरसह वापर केला आहे, जो रोलेक्सचा सिंम्बॉलिक कलर आहे. 5 लाख 3 हजार रुपये या आयफोनची किंमत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या