आधार कार्डमध्ये वारंवार ही गोष्ट बदलू शकत नाही
मुंबई 16 सप्टेंबर : आधार कार्ड हा भारतीयांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. देशातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड (Aadhaar Card) असणं अनिवार्य आहे. आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र आहे. आधार कार्डमध्ये व्यक्तीची बायोमेट्रिक (Biometric Information) माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाते. लहान मुलांसाठीदेखील अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र असून, अगदी नवजात बालकाचंही आधार कार्ड काढण्याची सोय आहे. मुलांचं आधार कार्ड नसेल तर त्यांना शाळेत घालण्यापासून ते सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यातही अडचणी येतात. तर, लहान मुलांचं आाधार कार्ड कसं तयार करायचं आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील, याबाबत जाणून घेऊयात. झी बिझनेसने या संदर्भात वृत्त दिलंय. Google Photos मध्ये आली कामाची नवी फिचर्स, यूजर्सही झाले भलतेच खूश! अंगणवाडी किंवा आधार केंद्रात मिळतं आधार कार्ड देशातील अनेक रुग्णालयांमध्ये बाळाचा जन्म होताच आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या मुलाचं आधार कार्ड तुमच्या जवळच्या आधार केंद्रात किंवा अंगणवाडीत तयार करून घेऊ शकता. मुलाचं आधार मिळवण्यासाठी, तुम्हाला आधार एन्रोलमेंट फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला मुलाशी संबंधित आवश्यक डिटेल्स भरावे लागतील. फॉर्मबरोबरच तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फोटोकॉपीही जोडाव्या लागतील. आधार कार्ड काढण्याची प्रोसेस कशी आहे? फॉर्म भरल्यानंतर काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याला तो द्या. त्यानंतर कर्मचारी तुमच्या मुलांच्या आधार कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू करेल. त्यानंतर आधार कर्मचारी तुमच्या मुलाचं नाव, वडिलांचं नाव, घरचा पत्ता, जन्म तारीख, लिंग या सर्व गोष्टी भरल्यानंतर त्याचा फोटो घेतील. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. ही स्लिप सांभाळून ठेवा, कारण या एन्रोलमेंट नंबरवरून तुम्ही ऑनलाइन स्टेटस बघू शकता तसंच तयार झाल्यावर तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. Motorola Edge 30 Ultra: तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन पाहिलाय का? पाहा खास Photos आधार कार्डसाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात? मुलाचं आधार कार्ड काढण्यासाठी कोणत्याही विशेष कागदपत्राची आवश्यकता नाही. मुलाचं आधार बनवण्यासाठी त्याचं जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटलमधून मिळालेले डिस्चार्ज पेपर आवश्यक आहेत. याबरोबरच मुलाच्या पालकांपैकी एकाचं आधार कार्डदेखील सोबत असणं आवश्यक आहे. नवजात बालक ते 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचं आधार कार्ड काढताना त्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. त्याऐवजी त्यांच्या आई-वडिलांच्या हातांच्या बोटांचे ठसे वापरले जातात. पाच वर्षांनंतर मुलांच्या आधारकार्डवरील बायोमेट्रिक माहिती अपडेट केली जाते. 5 वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डला बाल आधार असं म्हणतात आणि ते फिकट निळ्या रंगाचं असतं. अशा रितीने तुम्ही तुमच्या लहान मुलांचं आधार कार्ड काढून घेऊ शकता.