नवी दिल्ली, 26 जून : फेसबुक (Facebook) सोशल मीडिया कम्युनिकेशनचं एक सशक्त माध्यम आहे. परंतु याच कम्युनिकेशनच्या प्रक्रियेत अनेकदा काही Unwanted लोक कंमेट करतात आणि अशा लोकांना नियंत्रित करणं कठीण होतं. आता या लोकांना कंट्रोल कसं करावं, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. परंतु एका ट्रिकद्वारे फेसबुकवर अशा लोकांच्या कंमेट थांबवता येऊ शकतात. Post Hide - Post Hide करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या पोस्टवर जावं लागेल. त्यानंतर तीन डॉट ऑप्शनवर क्लिक करा. इथे Edit Privacy मध्ये जावं लागेल. त्यानंतर ‘Friends except’ वर टॅप करावं लागेल आणि त्या व्यक्तीला सिलेक्ट करावं लागेल, ज्याला तुम्हाला फेसबुक पोस्टवर हाईड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही हाईड केलेला व्यक्ती पोस्ट पाहू शकत नाही, तसंच कमेंटही करू शकत नाही.
Hide Comment - फेसबुक पोस्टवर एखाद्याची कमेंट न आवडल्यास तीदेखील हाईड करता येऊ शकते. त्यानंतर ती कंमेंट फ्रेंड लिस्टमधील (Friend list) लोकांना दिसणार नाही. कमेंट हाईड करण्यासाठी फेसबुक कमेंट सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर कमेंटवर लाँग प्रेस करा. इथे हाईड कमेंटचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर ती कंमेंट हाईड होईल. ती कमेंट पुन्हा दिसायला हवी असल्यास कमेंटवर लाँग प्रेस करुन अनहाईडचा पर्याय निवडा.
फेसबुकवर असं करा ब्लॉक - फेसबुकवर एखाद्याला ब्लॉक करण्यासाठी Settings & Privacy > Settings > Blocking > Add to Block List मध्ये जावं लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीला सिलेक्ट करा, ज्याला फेसबुकवर ब्लॉक करायचं आहे.