नवी दिल्ली, 11 जानेवारी : भारतातील प्रत्येक नागरिकासाठी Aadhaar Card सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ऑनलाइन बँकिंगपासून अनेक खासगी-सरकारी कामांसाठी आधार कार्ड गरजेचं असतं. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज असते. आधारच्या वाढत्या वापरासह, याचा चुकीचा वापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आधारची सुरक्षा महत्त्वाची ठरते. कोणत्याही आधार कार्डचा चुकीचा वापर न होण्यासाठी सरकार वेळोवेळी याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत असते. घरबसल्या तुम्ही आधार कार्ड असली की नकली याची माहिती मिळवू शकता, तसंच इतर कोणी व्यक्ती तुमच्या आधारचा चुकीचा वापर करत नाही ना? हे देखील तपासता येतं. चुकीच्या वापरापासून सुरक्षित राहण्यासाठी आधार कार्ड लॉक-अनलॉक करता येतं.
कसं Lock कराल Aadhaar Card - आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात आधी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरुन 1947 वर GETOTP मेसेज लिहून पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला पुन्हा 1947 या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ आणि हा OTP लिहून पाठवायचा आहे. अशाप्रकारे तुमचं आधार कार्ड लॉक होईल. Aadhaar Card Unlock कसं कराल - लॉक आधार कार्ड पुन्हा अनलॉक करण्यासाठी तुमच्या मोबाइल नंबरवरुन 1947 या नंबरवर GETOTP असा मेसेज पाठवा. मेसेज पाठवल्यानंतर मोबाइलवर एक OTP येईल. तुम्हाला ‘UNLOCKUID आधार नंबर’ आणि OTP लिहून 1947 वर मेसेज पाठवावा लागेल. आता तुमचं आधार कार्ड अनलॉक होईल.
Online कसं कराल लॉक कराल Aadhaar - - सर्वात आधी UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा. - त्यानंतर Aadhaar Service कॉलममध्ये Aadhar Paperless Offline E-KYC च्या खाली lock/unlock biometric वर क्लिक करा. - एक नवं पेज ओपन होईल. त्यावर स्क्रोल करुन खालच्या बाजूला जा आणि Confirm वर क्लिक करा. - त्याखाली lock/unlock biometric वर क्लिक करा. आता कॅप्चा कोडसाठी पेज ओपन होईल. - इथे 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून Send OTP वर क्लिक करा. - तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिटवर क्लिक करा.