JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जुन्या फोनची मिळेल चांगली व्हॅल्यू, विकताना या गोष्टींकडे लक्ष द्या

जुन्या फोनची मिळेल चांगली व्हॅल्यू, विकताना या गोष्टींकडे लक्ष द्या

सर्व ब्रँडच्या स्मार्टफोनसाठी चांगली रिसेल व्हॅल्यू (Smartphone Resale Value) मिळत नाही. कोणत्याही स्मार्टफोनची रिसेल व्हॅल्यू मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मे : स्मार्टफोन जुना झाल्यानंतर अनेकजण तो रिसेलमध्ये विकतात किंवा कोणालातरी वापरायला देतात. पण सर्व ब्रँडच्या स्मार्टफोनसाठी चांगली रिसेल व्हॅल्यू (Smartphone Resale Value) मिळत नाही. तसंच फोनची व्हॅल्यू कमीही होत जाते. फोन घेतल्यानंतर तो एक किंवा दोन महिन्यांनंतर विकायचा असल्यासही त्याची व्हॅल्यू मनाप्रमाणे मिळत नाही. कोणत्याही स्मार्टफोनची रिसेल व्हॅल्यू मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणताही जुना फोन तुम्ही दोन प्रकारे विकू शकता. एकतर तो विकू शकता किंवा दुसऱ्या फोनसह एक्सचेंज करू शकता. फोन विकण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन प्रकार वापरता येतात. एक्सचेंजमध्ये मिळते बेस्ट व्हॅल्यू - जुना फोन नवीन फोन खरेदी करताना एक्सचेंज करू शकता. सेल सुरू असताना फोन एक्सचेंज करणं एक फायद्याची डील ठरते. यात फोनच्या एक्सचेंज व्हॅल्यूसह एक्सचेंज बोनसही मिळतो. म्हणजेच फोनच्या व्हॅल्यूसह बोनसचाही फायदा घेऊ शकता. एखाद्या जुन्या फोनला रिप्लेस करण्याचा हा सर्वात चांगला पर्याय ठरतो. पण बेस्ट व्हॅल्यू मिळवण्यासाठी बंपर डिस्काउंट असणाऱ्या सेलची वाट पाहावी लागेल. OLX, Cashify सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही तुमचे जुने विक्री-खरेदी करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे फोनची व्हॅल्यू त्याच्या कंडिशनवर अवलंबून आहे. फोनची चांगली व्हॅल्यू मिळवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

हे वाचा -  केवळ या एका नंबरने हॅक होईल WhatsApp Account, चुकूनही करू नका डायल

फोन रिसीप्ट - ज्यावेळी नवा फोन खरेदी करता, त्यावेळी रिसीप्टही मिळते. हे बिल, रिसिप्ट जपून ठेवणं गरजेचं आहे. यामुळे फोनचे चांगले पैसे मिळण्यास मदत होऊ शकते.

हे वाचा -  Guarantee-Warranty काळात कंपनीने प्रोडक्ट दुरुस्त करण्यास नकार दिल्यास काय कराल? या दोन्हीत काय आहे फरक

फोन ज्या कंडिशनमध्ये आहे, त्यानुसारच त्याची व्हॅल्यू मिळते. तसंच तुमच्याकडे फोनसोबत आलेल्या ओरिजनल एक्सेसरीज असल्यास अधिक व्हॅल्यू मिळू शकते. एक्सेसरीज नसल्यास कंपन्या पैसे पैसे तुमच्या फोनच्या व्हॅल्यूतून कट करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या