JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, अशाप्रकारे मिळवता येईल परत

Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, अशाप्रकारे मिळवता येईल परत

तुमचं आधार कार्ड हरवलं (Lost Aadhaar Card) असेल, तर काळजी करू नका. UIDAI ने ट्विट करत हरवलेलं आधार कार्ड परत कसं मिळवता येईल याबाबत माहिती शेअर केली आहे.

जाहिरात

Aadhar card update

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जुलै: अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं कागदपत्र आहे. इनकम टॅक्स रिटर्न, गॅस कनेक्शन, पासपोर्ट, बँक अकाउंट अशा अनेक कामांसाठी आधार कार्डचा ID Proof म्हणून वापर केला जातो. ऑनलाईन बँकिंग, रेशन कार्ड बनवण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. अशात तुमचं आधार कार्ड हरवलं (Lost Aadhaar Card) असेल, तर काळजी करू नका. UIDAI ने ट्विट करत हरवलेलं आधार कार्ड परत कसं मिळवता येईल याबाबत माहिती शेअर केली आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड हरवल्यास जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जा. इथे डेमोग्राफिक (Demographic) डिटेल्स द्यावे लागतील. त्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Authenticating with biometrics) केलं जाईल. इथे आधार नंबर द्यावा लागेल. एनरोलमेंट सेंटरमध्ये ई-आधारही मिळेल. यासाठी काही पैसे भरावे लागतील. आपला मोबाईल नंबर आधारशी अपडेट ठेवण्याचा सल्ला UIDAI ने दिला आहे. तसंच आधार कार्ड हरवल्यानंतर 1947 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन डिटेल्स दिल्यानंतरही युजरला मदत मिळेल.

(वाचा -  ना कॅश ना कार्ड, आता केवळ FASTag नेच भरता येणार पेट्रोल, वाचा काय आहे प्रोसेस )

आधारसह मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट असल्यास ऑनलाईनदेखील आधार कार्ड मिळवता येतं. यासाठी uidai.gov.in वर लॉगइन करा, यात Retrieve Lost/forgotten EID/UID सिलेक्ट करा. मोबाईलवर एक OTP येईल, त्यानंतर आधार कार्ड मिळवता येईल.

संबंधित बातम्या

(वाचा -  Pegasus Spyware चा धोका; कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, WhatsApp हॅकची शक्यता )

आधार कार्ड हरवल्यानंतर एखाद्याकडे डेमोग्राफिक डिटेल्स नसतील, एनरोलमेंट नंबर लक्षात नसेल किंवा मोबाईल नंबर आणि ईमेलदेखील रजिस्टर्ड नसेल तरी घाबरण्याची गरज नाही. ग्राहक आधार सेवा केंद्र किंवा रिजनल ऑफिसमध्ये जावून मदत मिळवू शकतात. कोणत्याही मदतीसाठी टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करू शकता किंवा help@uidai.gov.in वर मेलही करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या