नवी दिल्ली, 31 मे : स्मार्टफोन वापरताना त्याच्या बॅटरीचीही तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक जण बॅटरी पूर्णपणे संपल्यानंतरच आपला फोन चार्ज (Phone Charging) करतात. तर, काही लोक कधीही फोन चार्जिंगला लावतात. जर तुम्हीही अशाप्रकारच्या छोट्या-मोठ्या चुका करत असाल, तर जाणून घ्या फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत (Phone Charging Tips). आजकाल मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत अनेक जणांना स्मार्टफोन अॅडिक्शन (Smartphone Addiction) झालं आहे. कोरोना काळात लॉकडाउनमुळे लोक दिवस-रात्र कामासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी सतत मोाबईल फोनचा वापर करतात. त्यामुळे फोनची बॅटरी (Phone Battery Status) लवकर संपते. अनेकांना आपला फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत माहित नसल्याने, काही चुका होतात आणि स्मार्टफोन लवकर खराब होण्याची शक्यता निर्माण होते. अनेकांना आपला फोन नेहमीच पूर्ण अर्थात 100 टक्के चार्ज करुन ठेवण्याची सवय असते. कुठे जाण्यापूर्वी किंवा घरी असतानाही फोन पूर्ण 100 टक्के चार्ज करतात. परंतु टेक एक्सपर्ट्सनी (Tech Expert) दिलेल्या माहितीनुसार, असं करणं फोनच्या बॅटरीसाठी योग्य नाही. कधीही फोन चार्ज कराल, तेव्हा तो 100 टक्के चार्ज करू नये. फोन 100 टक्क्यांहून काहीसा कमी चार्ज करावा. फोन केवळ 80-90 टक्के चार्ज करावा. यामुळे बॅटरी लाईफ (Phone Battery Life) वाढते.
अनेक स्मार्टफोन युजर्स, फोन चार्जिंगला लावून झोपतात (Overnight Phone Charging), जेणेकरुन सकाळी उठल्यानंतर त्यांचा फोन पूर्ण चार्ज असेल. आजकाल स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी अनेक तासांची गरज लागत नाही. अनेक तास फोन चार्जिंगला लावणं, त्याच्या बॅटरीसाठी योग्य नाही. त्यामुळे फोन तुम्ही जागे असतानाच चार्ज करा आणि काही वेळाने चार्जिंग बंद करा. गरजेपेक्षा अधिक फोन चार्ज करू नये. यामुळे दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
अनेक जण असेही असतात, जे बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यानंतर, चार्जिंगला लावतात. परंतु हेदेखील योग्य नाही. बॅटरी 20 टक्के राहिल्यानंतर फोन चार्जिंगसाठी लावावा. 20 ते 80 टक्के बॅटरी असणं फोनसाठी योग्य आहे. आजकाल अनेक स्मार्टफोनमध्ये लिथियम बॅटरी (Lithium Battery) असते, असा फोन काही काही वेळाने चार्ज होत राहिल्याने त्याची बॅटरी लाईफ अधिक काळापर्यंत टिकते.