JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google काही सेकंदात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? जाणून घ्या यामागे काय असते प्रोसेस

Google काही सेकंदात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? जाणून घ्या यामागे काय असते प्रोसेस

Google कडे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी येतात? गुगल कसं काम करतं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून : इंटरनेटचा वापर करणाऱ्यांसाठी गुगल (Google) सर्वात महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगलवर मिळतं. पण गुगल इतक्या लगेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी देतो? एका क्लिकवर अगदी सहजपणे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण Google कडे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी येतात? गुगल कसं काम करतं? Crawling - Google वर ज्यावेळी आपण काहीही सर्च करतो, त्यावेळी सर्वात आधी गुगल हे चेक करतो, की वेब पेजेसवर त्यासंबंधी काय-काय कंटेंट आहे. या प्रोसेसला Crawling म्हणतात. क्रॉलिंगसाठी Google bot चा प्रयोग केला जातो. या प्रोसेसमध्ये गुगल इतर पेजेसला क्रॉल करतो आणि नवं पेज इंडेक्स जोडत राहतो. Google bot एक Web Crawlers सॉफ्टवेअर आहे. जे Crawlers वेब पेज सर्च करतं आणि Crawlers त्यावर दिलेल्या लिंक्स फॉलो करतो. क्रॉलर्स अनेक लिंकवरुन डेटा एकत्र करुन Google च्या सर्व्हरवर आणतो.

(वाचा -  हॅकर्सपासून तुमचा Android Smartphone असा ठेवा सुरक्षित, आजच करा हे 5 बदल )

Indexing - Crawlers द्वारे वेबपेज मिळाल्यानंतर Google चं सिस्टम वेगवेगळ्या पेजचा कंटेंट चेक करतो. यात फोटो, व्हिडीओ आणि वेब कंटेंट सर्व काही सामिल असतं. गुगल क्रॉल केलेलं पेज चेक करतो. यात कीवर्ड्स आणि वेबसाईट कंटेंटवर लक्ष दिलं जातं. त्याशिवाय वेबसाईट कंटेंटमध्ये किती नाविन्य आहे, कॉपी-पेस्ट तर नाही ना याचीही माहिती घेतली जाते.

(वाचा -  हाय सिक्योरिटी असूनही कसे लीक होतात WhatsApp Chat, वाचा काय आहे कारण )

जर एखादा डुप्लिकेट कंटेंट असेल, तर तो कॅन्सल केला जातो. ही संपूर्ण माहिती Google Index मध्ये स्टोर होते.

(वाचा -  एखाद्याच्या निधनानंतर त्याच्या Facebook Account चं काय होतं? )

Serving Result - ज्यावेळी आपण गुगलवर एखादी गोष्ट सर्च करतो, त्यावेळी गुगल आपल्याला त्यासंबंधीत इतरही अनेक प्रश्न आणि उत्तरं सांगतो. यात सर्वात वर सर्चच्या पेजचं रँकिंग असतं. या सर्व प्रोसेसव्यतिरिक्त गुगल काही आपल्या इंटरनल प्रोसेसरचीही मदत घेतो. त्यानंतरच Google तुमच्या प्रश्नांची उत्तरं काही सेकंदात देतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या