JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लॉकडाउनमध्येच Aadhaar Card हरवलं? कुठेही न जाता घरबसल्या असं बनवा नवं आधार कार्ड

लॉकडाउनमध्येच Aadhaar Card हरवलं? कुठेही न जाता घरबसल्या असं बनवा नवं आधार कार्ड

लॉकडाउन काळात आधार कार्ड हरवल्यास, कुठेही जाण्याची गरज नाही. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटद्वारे (UIDAI) आधार कार्ड रिप्रिंट करण्याची सुविधा मिळते.

जाहिरात

ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मे : सरकारी किंवा खासगी अशा जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्ड महत्त्वाचं ठरतं. देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अनेकदा आधार हरवल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाउन काळात आधार कार्ड हरवल्यास, कुठेही जाण्याची गरज नाही. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटद्वारे (UIDAI) आधार कार्ड रिप्रिंट करण्याची सुविधा मिळते. एका OTP ने होईल काम - यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, OTP ऑथेंटिकेशनद्वारे हरवलेलं आधार कार्ड पुन्हा मिळवता येऊ शकतं. यासाठी आधार वेबसाईट mAadhaar App चा वापर करावा लागेल. आधार रिप्रिंट करण्यासाठी 50 रुपये खर्च येईल. यामुळे नवं आधार कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पोस्ट केलं जाईल. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया -

(वाचा -  Oximeter शिवायच चेक करा ऑक्सिजन लेवल; मोबाईलनेच चेक करता येणार Oxygen Level )

घरबसल्या असं मिळवा नवं Aadhaar Card - - अधिकृत UIDAI वेबसाईटवर जा. - इथे Order Aadhaar Reprint पर्यायावर क्लिक करा. - तुमचा आधार नंबर (UID) किंवा एनरोलमेंट आयडी (EID) टाका. - खाली कॅप्चा कोड भरा. त्यानंतर Send OTP पर्यायावर क्लिक करा. - तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.

(वाचा -  Airtel CEO चा इशारा, चुकूनही हे App डाउनलोड करू नका, अन्यथा… )

- मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका, T&C चेकबॉक्समध्ये मार्क करा आणि सबमिटवर क्लिक करा. - Make Payment वर क्लिक करा. ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे पेमेंटवर क्लिक करा. - त्यानंतर एका पेमेंट गेटवेवर रिडायरेक्ट केलं जाईल. इथे 50 रुपये भरावे लागतील. - पेमेंट झाल्यानंतर आधार कार्ड प्रिंट होईल आणि 15 दिवसांत स्पीड पोस्टच्या माध्यमातून तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या