JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google वर या 3 गोष्टी चुकूनही Search करू नका, खावी लागेल जेलची हवा

Google वर या 3 गोष्टी चुकूनही Search करू नका, खावी लागेल जेलची हवा

गुगलकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च केल्या तर तुम्हाला थेट जेलमध्ये जावं लागू शकतं. असा काही कंटेंट आहे, जो चुकूनही गुगल सर्च करू नका, असं सर्च केल्यास मोठी समस्या येऊ शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे : कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल किंवा काही समस्या आल्यास अनेकजण सर्रास गुगल सर्च (Google Search) करतात. एखाद्या आजाराची माहिती घेणं, रेसिपी, शहरं, गावं, जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती गुगलवर सर्च केली जाते. कोणत्याही गोष्टीसाठी सर्वच जण गुगलचा वापर करतात. गुगलकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च केल्या तर तुम्हाला थेट जेलमध्ये जावं लागू शकतं. त्यामुळे गुगलवर काहीही सर्च करताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. असा काही कंटेंट आहे, जो चुकूनही गुगल सर्च करू नका, असं काही सर्च केल्यास मोठी समस्या येऊ (Do Not Search This 3 Things On Google) शकते. बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया - लोक गुगलवर अशाही गोष्टी सर्च करतात ज्याची काही गरज नसते. एखाद्या गोष्टीचं कुतूहल असल्याने त्या गोष्टी सर्च केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे बॉम्ब बनवण्याची पद्धत. गुगलवर कधीही बॉम्ब कसा बनवायचा, त्याची प्रक्रिया याबाबत चुकूनही सर्च करू नका. या सर्चवर, या गोष्टींवर सायबर सेलची नजर असते. असं सर्च करणं तुम्हाला समस्येत टाकू शकतं. सुरक्षा एजेन्सी तुमच्याविरोधात कारवाई करू शकतात. त्यात कारवाई झाल्यास थेट जेलची हवाही खावी लागू शकते.

हे वाचा -  तुमच्या फोनमध्ये तुमच्या नकळत कोणी काय पाहिलं? या Code ने मिळेल माहिती

गर्भपात - Google वर कधीही गर्भपात करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया सर्च करू नका. गुगलवर असं गर्भपाताच्या पद्धती शोधणं गुन्ह्याच्या श्रेणीत येतं. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपात करता येत नाही. असं सर्च करणं चांगलंच महागात पडू शकतं.

हे वाचा -  Alert! ‘विज बिल अपडेट करा अन्यथा कनेक्शन कट केलं जाईल’ असा मेसेज आल्यास सावधान, एका चूकीने बँक अकाउंट रिकामं होईल

चाइल्ड पॉर्न - भारत सरकार चाइल्ड पॉर्नोग्राफीबाबत अतिशय कठोर आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करणं, पाहणं किंवा शेअर करणं हा एक गुन्हा आहे. यासंबंधी कायद्याचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या