JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google Pay द्वारे किती रुपये ट्रान्सफर करता येतात? काय आहे एका दिवसाचं लिमिट

Google Pay द्वारे किती रुपये ट्रान्सफर करता येतात? काय आहे एका दिवसाचं लिमिट

Google Pay ने एका दिवसासाठी अर्थात सिंगल डे ट्रान्झेक्शन लिमिट ठेवलं आहे. त्याशिवाय तुम्ही एका दिवसात किती रुपये ट्रान्सफर करू शकतात यावरही Google Pay ने लिमिट ठेवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 मार्च : ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये (Online Transaction) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात गुगल पे (Google Pay) अतिशय पॉप्युलर UPI बेस्ड मनी ट्रान्सफर App आहे. Google Pay चा मोठा युजर आहे. तसंच वापरायलाही हे सोपं असल्याने अनेकजण Payment App म्हणून याचा वापर करतात. पण एकावेळी Google Pay द्वारे किती रुपये ट्रान्सफर करता येतात? Google Pay ने एका दिवसासाठी अर्थात सिंगल डे ट्रान्झेक्शन लिमिट ठेवलं आहे. त्याशिवाय तुम्ही एका दिवसात किती रुपये ट्रान्सफर करू शकतात यावरही Google Pay ने लिमिट ठेवलं आहे. Google Pay वर तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकता. Google Pay वर एका दिवसात मॅक्सिमस 10 ट्रान्झेक्शन करतात येतात. तसंच तुम्ही एका दिवसांत 2000 रुपयांहून अधिकची रिक्वेस्ट करू शकत नाहीत. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी Google Pay ला आपल्या लिमिटशिवाय काही बँक लिमिट्सही असतात.

हे वाचा -  Internet आणि Smartphone शिवाय असे ट्रान्सफर करता येतील पैसे

प्रत्येक बँकेचं लिमिट वेगवेगळं असतं. बँक लिमिटबाबत बँकेच्या वेबसाइटवर माहिती मिळू शकते. त्याशिवाय सिस्टमला रिसिव्हरच्या अकाउंटमध्ये काही सप्सेशियस, संशयास्पद अॅक्टिव्हिटी दिसल्यास ट्रान्झेक्शनला होल्ड करुन याबाबत माहिती मिळवता येते.

हे वाचा -  या बँकांमध्ये झाले सर्वाधिक Bank Fraud, तुमचंही खातं यात आहे का?

Google Pay चं लिमिट संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहू शकता. त्याशिवाय इतर पेमेंट मेथेड ऑनलाइन नेट बँकिंग (Online Net Banking) किंवा NEFT चा वापर करू शकता. Google Pay UPI लिमिट वाढवण्यासाठी कोणताही इतर पर्याय नाही. जर तुमच्या व्यवसायात याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असेल, तर तुम्ही कस्टमर केयरला कॉल करुन लिमिट वाढवण्याची रिक्वेस्ट करू शकता. दरम्यान, डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI123 सर्विस लाँच केली आहे. नवी UPI सर्विस खास फीचर फोन्ससाठी लाँच करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या