नवी दिल्ली, 27 मे : गुगल मॅपमुळे (Google Maps) अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायक वाटतो. Google Maps मुळे Routes समजणं आणि रस्ता शोधण्यासाठी अधिक कोणाला विचारवं लागत नाही. एवढंच नाही, तर कोणत्या ठिकाणी, कोणत्या मार्गांवर ट्रॅफिक आहे, याचीही माहिती मिळेत आणि अशावेळी दुसऱ्या मार्गाचा वापर केला जाऊ शकतो. आता येणाऱ्या काही महिन्यात गुगल मॅप्स एक नवं फीचर आणणार आहे. हे फीचर केवळ Traffic पासूनच वाचवणार नाही, तर पर्यावरण सुधारण्यासदेखील उपयुक्त ठरेल. तसंच या नव्या फीचरमुळे इंधनाचीही बचत होण्यास मदत होईल. अशी होईल इंधनाची बचत - नव्या फीचरमध्ये Google Maps त्या मार्गांबाबत सुचवेल, जिथे कमी ट्रॅफिक असेल. ज्यामुळे ड्रायव्हर एकसमान गतीने गाडी चालवू शकेल. अशा Route वर ड्रायव्हरला कमीत-कमी ब्रेक लावण्याची आवश्यकता असेल.
मशिन लर्निंगच्या माध्यमातून रोड ग्रेड, ट्रॅफिक फ्लो आणि तुमच्या प्रवासाच्या अंतराचा अंदाज लावून, तुमच्यासाठी बेस्ट Route चा सल्ला देईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवास सोपा होईल आणि इंधनाचीही बचत होईल. यामुळे ट्रॅफिकही कमी होईल, ज्यामुळे पर्यावरण सुधारण्यास काहीसा हातभार लागेल.
Google कडून स्ट्रिट Maps मध्ये सुधारणा - Google आपल्या स्ट्रिट मॅप्समध्ये सुधारणा करत आहे, ज्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना आपला Route प्लॅन करण्यास अधिक मदत मिळेल. नव्या सुधारणेमध्ये फुटपाथ आणि रस्त्याची रुंदी दाखवली जाईल, ज्यामुळे पायी चालणाऱ्यांसह, अपंग व्यक्तींनाही मदत मिळेल. त्याशिवाय मॅपमध्ये देण्यात आलेला लाईव्ह व्ह्यू फीचर आता व्हर्च्युअल स्ट्रिट सायन्ससह, काही इमारतींचं इनडोर नेव्हिगेशनही दाखवेल.