नवी दिल्ली, 17 डिसेंबर : Google Chrome अतिशय लोकप्रिय वेब ब्राउजर असून Google मुळे कोणत्याही वेबसाइटवर कोणतीही माहिती, काहीही सर्च करणं अतिशय सोपं झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता Google ने एक असं फीचर आणलं आहे, ज्यामुळे युजरला ऑनलाइन शॉपिंगमध्ये मदत होऊ शकते. गुगल क्रोमचं हे फीचर युजर्सला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर खरेदी करू इच्छित असलेल्या सर्व प्रोडक्ट्सच्या कमी किंमतीबद्दलची माहिती आधीच देईल. Google Chrome ने हे नवं फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे युजर्स सहजपणे ऑनलाइन शॉपिंग करू शकतील. अनेकदा आपल्याला ऑनलाइन शॉपिंग करताना एखादी वस्तू खरेदी करायची असते, परंतु ती महाग असल्याने खरेदी करता येत नाही. आणि ज्यावेळी त्या वस्तूची किंमत कमी होते, त्यावेळी कमी किमतीत खरेदीची संधी अनेकदा निघून गेलेली असते. परंतु आता Google च्या नव्या फीचरमुळे शॉपिंग वेबसाइट्सआधीच तुमच्या आवडीच्या प्रोडक्टची किंमत कमी झाल्याची माहिती मिळेल.
Track Price - Google च्या या ट्रॅक प्राइजेस फीचरद्वारे गुगल क्रोमच्या टॅब्स सेक्शनमध्ये अशा प्रत्येक प्रोडक्टची अपडेटेड प्राइज दिसेल, जे प्रोडक्ट तुम्ही सर्च केलं होतं. या नव्या फीचरमुळे सतत फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनसारख्या वेबसाइट्स ओपन करण्याची गरज भासणार नाही. युजरला टॅब्स असणाऱ्या ठिकाणी सर्च केलेल्या प्रोडक्टची कमी झालेली किंमत अपडेट केली जाईल.
Google Chrome ने सध्या हे फीचर अमेरिकेत लाँच केलं आहे. अमेरिकेतही केवळ अशा युजर्सला हे फीचर मिळणार आहे जे Android OS वर चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर करतात. परंतु लवकरच हे फीचर iOS युजर्ससाठीही जारी केलं जाण्याचं सांगण्यात आलं आहे.