नवी दिल्ली, 12 मार्च : टेलिकॉम कंपनी एयरटेल (Airtel) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे आकर्षक प्लॅन लाँच करत असते. प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी आपल्या सर्विस रिवाईजही करतात. एयरटेल युजर्ससाठी अनेक प्लॅन ऑफर करतं. परंतु त्यापैकी आपल्यासाठी नेमका कोणता प्लॅन फायदेशीर आहे हे समजणं अनेकदा कठिण होतं. एयरटेलचा असाच एक प्लॅन आहे, ज्यात केवळ 1 रुपयांच्या फरकाने अनेक फायदे मिळतात. 28 दिवसांची अधिक वॅलिडिटी - केवळ 1 रुपये फरक असलेला हा एयरटेलचा 448 आणि 449 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. तुम्हाला वाटेल केवळ 1 रुपयाच्या फरकाने इतके फायदे कसे मिळतील. पण या 1 रुपयाच्या फरकाने असेलल्या प्लॅनच्या सर्विसमध्ये मोठा फरक आहे. सर्वात मोठा फरक प्लॅनच्या वॅलिडिटीचा आहे. 448 रुपयांच्या प्लॅनपेक्षा, 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची अधिक वॅलिडिटी मिळते.
448 प्लॅन - युजरला या प्लॅनमध्ये दिवसाला 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा आहे. हे सर्व फायदे युजर्सला 28 दिवसांच्या वॅलिडिटीवर मिळतात. Disney+ Hotstar VIP चं 1 वर्षाचं फ्री सब्सक्रिप्शन, तसंच प्राईम व्हिडीओ मोबाईल सब्सक्रिप्शन मिळतं. त्याशिवाय Airtel Xstream Premium, अनलिमिटेड चेंजसह फ्री हॅलोट्यून्स, विंक म्युझिक, 1 वर्षाच्या वॅलिडिटीसह Shaw Academy चा फ्री ऑनलाईन कोर्स आणि FASTag च्या खरेदीवर 100 रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळतो आहे.
449 प्लॅन - या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 SMS मिळतात. या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये प्राईम व्हिडीओ मोबाईल सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड चेंजसह फ्री हॅलोट्यून्स, Airtel Xstream Premium, विंक म्युझिक आणि FASTag खरेदीवर 100 रुपये कॅशबॅकही मिळतो आहे.
448 रुपयांच्या प्लॅनसह Disney Plus Hotstar VIP चा अॅक्सेस ऑफर केला जात आहे, जो 449 रुपयांसह मिळणार नाही.